घरफिचर्ससारांशडेनिस डिडरोट इफेक्ट

डेनिस डिडरोट इफेक्ट

Subscribe

समजा आपण ५० हजार किंवा एक लाखाचा मोबाईल घेतला तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून मोबाईलला महागडा गोरील्ला ग्लास लावणार. ५०० रुपयांचे जुने कव्हर बदलणार. १०० रुपयांचा हेडफोन चालला असता, पण अडीच-तीन हजारांचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त वस्तू शोभून दिसत नाहीत. हे सर्व कशासाठी? इतरांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी. यालाच म्हणतात ‘डिडरोट इफेक्ट’. थोडक्यात सांगायचे तर एक नवीन वस्तू विकत घेतली की तिच्यामुळे दुसर्‍या वस्तूचा दर्जा आपोआपच कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

–राम डावरे

रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ. स. १७६५ मध्ये त्याचे वय जवळपास ५२ वर्षे होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठीसुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते इतका तो गरीब होता. त्यावेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरिबीबद्दल कळले. तिने डिडरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी १००० पौंड म्हणजेच ५० हजार डॉलर्स म्हणजे आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व आपले ग्रंथालय विकून टाकले.

- Advertisement -

डेनिस डिडरोट एका दिवसात खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशांतून लगेच ‘स्कार्लेट रॉब’ म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असताना त्याला वाटले की आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय, पण आपल्या घरात मात्र तशा उच्च प्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्हीही शोभून दिसत होते, परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्जही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधात लिहून ठेवले. यालाच मानसशास्त्रातील ‘डिडरोट इफेक्ट’ म्हणतात.

मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स, राजकीय नेते, कॉर्पोरेट नेतेही (विजय मल्ल्या याचे उत्तम उहाहरण) या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने, अनावधानाने अवलंब करतात.

- Advertisement -

समजा आपण महागडी गाडी घेतली, मग आपण गाडीला शोभेसे ड्रेस घेतो, त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गॉगल इत्यादी घेणार.

घरात मोठा टीव्ही आणला की चांगला टेबल, फर्निचर, एचडी वाहिन्या सुरू करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण ५० हजार किंवा एक लाखाचा मोबाईल घेतला, तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून मोबाईलला महागडा गोरील्ला ग्लास लावणार. ५०० रुपयांचे जुने कव्हर बदलणार. १०० रुपयांचा हेडफोन चालला असता, पण अडीच-तीन हजारांचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त वस्तू शोभून दिसत नाहीत. हे सर्व कशासाठी? इतरांवर इम्प्रेशन पाडण्यासाठी. यालाच म्हणतात ‘डिडरोट इफेक्ट.’

थोडक्यात सांगायचे तर एक नवीन वस्तू विकत घेतली की तिच्यामुळे दुसर्‍या वस्तूचा दर्जा आपोआपच कमी होतो आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

आपण एक वस्तू घ्यायला गेलो की दुसर्‍या वस्तू आपोआपच घेतो, गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्त्वाच्या नसणार्‍या वस्तू घेत असतो आणि ते आपणास कळतसुद्धा नाही. म्हणजे एका वस्तूमुळे दुसर्‍या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो ‘डिडरोट इफेक्ट’ होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात, पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळत अनावश्यक खर्च करीत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं, तर काहींच्या लक्षात खूप उशिरा येतं, पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही, पण नंतर हिशोब लागत नाही तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना या वस्तूची मला कितपत गरज आहे, असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे का? याचा विचार करून मिळेल त्या किमतीत न घेता ती वाजवी किमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो, लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती वस्तू कितीही चांगली असली तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंदही संपतो आणि पैसेही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे, पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. माझ्या एका अर्थसाक्षरतेच्या सेमिनारमध्ये मी प्रश्न विचारला की, तुमचे राहते घर ही तुमची लायबिलिटी आहे की मालमत्ता आहे.

बर्‍याच लोकांनी सांगितले की, मालमत्ता आहे, मग मी त्यांना विचारले की, जर मालमत्ता आहे तर त्यापासून तुम्हाला किती उत्पन्न मिळते. सर्वांनी सांगितले शून्य उत्पन्न मिळते, मग त्या घरावर तुम्ही किती खर्च करता हे विचारले तर खर्चाची भलीमोठी यादी तयार झाली. मग सर्वांना समजले की राहते घर हे मालमत्ता आहे की लायबिलिटी? अर्थात याला अपवाद म्हणजे स्वतःच्या घरात स्वतः मालक म्हणून राहण्याचा आनंद, परंतु घर स्वतःचे असावे की भाड्याचे असावे हा निर्णय अनेक गोष्टी विचारात घेऊन घ्यावा लागतो हेही खरे आहे.

हे कसं टाळता येऊ शकतं?

१. पहिले आधी मान्य करा की आपण गरज नसलेल्या वस्तू केवळ चांगले दिसावे म्हणून खरेदी करतो हे मान्य केले की मग त्यावर हळूहळू नियंत्रण मिळविणे सोपे होऊन जाते.

२. खरेदी करताना आपल्या आर्थिक परिस्थितीचे नीट आकलन करा. वर्षभरातील खरेदीचे बजेट आधीच ठरवा व त्यानुसार खरेदी करा.

३. आपल्या आनंदाची नीट व्याख्या करा. भौतिक गोष्टीमध्ये किती आनंद आहे आणि तो आनंद मिळविण्यासाठी पैसेही खर्च होतात. सोशल मीडियावरील जाहिराती बघून त्यात स्वतःचा आनंद शोधू नका. इतरांची लाईफ स्टाईल बघून तुमचे खरेदीचे निर्णय घेऊ नका.

४. वस्तूंची उपयुक्तता बघून खरेदी करा, फक्त दिखाऊपणासाठी खरेदी करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -