घरफिचर्ससमुद्रपक्षी आणि फेरी

समुद्रपक्षी आणि फेरी

Subscribe

सूरय हा छोट्या ते मध्यम आकाराचा, कुरवपेक्षा अधिक सडपातळ पक्षी. तसे सर्वच सुरय स्थलांतर करतात. आर्क्टिक सुरयाचे स्थलांतर जगविख्यात आहेच. पण त्यातही दोन विभागन्या. एक म्हणजे समुद्री सुरय व दुसरी दलदली सुरय. समुद्री सुरय नेहमीच समुद्राजवळ आढळतात असे नाही. हलका राखाडी रंग व प्रजनन काळात डोक्यावर काळ्या टोप्या सुरय पक्ष्याला इतर समुद्री पक्षापासून वेगळी ओळख देतात. त्यांची दुभंगलेली टोकदार शेपूट वादळी वार्‍यावरदेखील त्यांना शिकार करण्यास दिशा देते.

मागील 10 वर्षे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात माजी अलिबागला फेरी होते. अक्षी, रेवस व अलिबागचा समुद्रकिनारा माझ्यासारख्या कित्येक पक्षीमित्रांचे आवडीचे स्थान. दूर देशातून स्थलांतर करून आलेल्या सुरय (terns) व कुरव (gulls) पक्षांचे छायाचित्रण व अभ्यास करण्याची चांगली संधी अजून मोजक्याच ठिकाणी मिळते. सकाळची पहिली लोकल पकडून सीएसएमटी, मागच्या रस्त्याने किताब खाण्याच्या गल्लीत यादवच्या टपरीवर चहा आणि तेथून चालत थेट गेटवेपर्यंत. आज काही दुर्मिळ पाहायला मिळण्याची काय शक्यता असेल, हीच चर्चा. गेटवेहून सकाळी 7.30 किंवा 8.00 ची फेरी मिळाली की आपण वेळेत पोहोचू हेच मानसिक समाधान. गेटवेला पोहोचताच सर्वप्रथम दर्शन होते ते म्हणजे समुद्र आणि सुरय व कुरव पक्ष्यांचं. समुद्रावर गास्त घालणार्‍या या पांढर्‍या पक्ष्यांना साधारणतः सी गल्स म्हणूनच ओळखले जाते. पण त्यातही वेगळ्या जाती.

कुरव हे साधारण मध्यम ते मोठ्या आकाराचे समुद्रपक्षी. कुरव पक्ष्याच्या बर्‍याच जाती समुद्रात स्थित बेटांवर आढळून येतात व काही जाती त्यांचे पूर्ण जीवन समुद्रात वास्तव्य करतात. या पक्ष्याचा रंग सफेद व काळा जरी असला, तरी पहिल्या चार वर्षात त्यावर तपकिरी छटा दिसून येतात. या छटा त्याचे पूर्णपणे प्रौढ न झाल्याचा अंदाज देतात. त्यांचे शरीरही त्याच स्वरूपात विकासित झालेले असते, जेणे करून ते सफाईने उडू व शिकार करू शकतात. बहुतेक सर्व जातीचे कुरव पक्षी स्थलांतर करतात. मध्य आशियाई उड्डाण महामार्गाचे अडथळे ओलांडून ते देशातील विविध जलाशयात मुक्कामासाठी दाखल होतात. स्थलांतरादरम्यान शेकडो पक्षी मरणही पावतात, तरीही प्रवास मात्र सुरू राहतो. भारतात दाखल झाल्यावर पुढील प्रश्न इथल्या स्थानिक पक्ष्यांसोबतचे सहअस्तित्व, ज्यात शिकार मिळवण्याची स्पर्धा आलीच.

- Advertisement -

सूरय हा छोट्या ते मध्यम आकाराचा, कुरवपेक्षा अधिक सडपातळ पक्षी. तसे सर्वच सुरय स्थलांतर करतात. आर्क्टिक सुरयाचे स्थलांतर जगविख्यात आहेच. पण त्यातही दोन विभागन्या. एक म्हणजे समुद्री सुरय व दुसरी दलदली सुरय. समुद्री सुरय नेहमीच समुद्राजवळ आढळतात असे नाही. हलका राखाडी रंग व प्रजनन काळात डोक्यावर काळ्या टोप्या सुरय पक्ष्याला इतर समुद्री पक्षापासून वेगळी ओळख देतात. त्यांची दुभंगलेली टोकदार शेपूट वादळी वार्‍यावरदेखील त्यांना शिकार करण्यास दिशा देते.

याच्या आधारे ते समुद्रात सूर मारून माशांची सफाईने शिकार करू शकतात. छोटा व मोठा तुरेवाला सुरय, लगाम सुरय, धूसर सुरय, गुलाबी सुरय इत्यादी ही समुद्री सुरयाची उदाहरणे.
दलदली सुरयाची शेपूट समुद्री सुरयापेक्षा कमी टोकदार असते व प्रजनन काळात पोटाचा काळपट भाग हे त्याचे वैशिष्ठ्य. नदी सुरय हे उदाहरण.
सुरय व कुरव पक्षातील फरक उडताना जास्त स्पष्टपणे सांगता येतो. कारण टोकदार आणि पातळ पंख व शेपूट. त्यांना म्हणूनच विदेशात flying scissors म्हणूनही ओळखले जाते.
एवढे विलक्षण, सुंदर व इतके लांब अंतर कापून स्थलांतर केलेल्या पक्ष्यांचे स्वागत आपण कसे करतो?
पक्ष्यांच्या स्वास्थ्याचे ध्यान व सामाजिक भान न बाळगता.

- Advertisement -

गेटवे वरून पकडलेल्या 7.30, 8.00 व बहुतेक फेरीमधील love birds म्हणजेच अलिबागला पर्यटनासाठी जाणार्‍या जोडप्यांचे स्थलांतर अजून कठीण. त्यात फेरीच्या मागे उभे राहून प्रियकराने उडवलेले कुरकुरे आणि गाठीया कुरव व सुरय पक्षी हवेत पकडून खात असता प्रेयसी एकदम भांबावून जाते.

My God, this is incredible! म्हटल्यावर प्रियकर संपूर्ण पुडा उधळल्याशिवाय राहत नाही. 45 मिनिटांचा प्रवास मांडव्याला संपताच ही जोडपे पुढील प्रवासाला लागतात. परंतु हे पक्षी पुन्हा फिरतात नवीन फेरीकडे, याच आशेने की त्यांना सहज शिकार मिळेल. केवळ मरीन ड्राइव्ह, नवी मुंबई नव्हे तर देशभरात ही एक मोठी समस्या आहे. त्रिवेणी संगम येते स्थलांतरीत साइबेरियन कुरव कशाप्रकारे निर्माल्यावर आपली उपजीविका साधत आहेत हे काही वेगळे सांगायला नको.

मनुष्य चांगल्या भावनेने या पक्ष्यांना खायला घालतो, पण यात नुकसान पक्ष्यांचे होत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. साधी सोपी उदाहरणे म्हणजे:
1) परतीच्या प्रवासाला लागणारी ऊर्जा या पदार्थातून मिळत नाही.
2) पक्ष्यांच्या अन्नपचन संस्थेत न दुरुस्त होणारे विकार.
3) पक्ष्यांमधील रोगांचा वाढता प्रसार.
4) पुढील पिढ्यांना चुकीचा संदेश पोहोचवणे.

(लहान मुलांना गर्डनमधील पेंग्विनच्या चोचीत व कांगरूच्या पोटात कचरा टाकण्यास प्रोत्साहन देणेसुद्धा त्यातलाच एक प्रकार).

आपल्याला मिळालेला हा नैसर्गिक वारसा हीच आपली संपत्ती आहे. ही संपत्ती पुढील पिढीला हस्तांतरित करण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच. भारतात शंभरहून अधिक पक्ष्यांच्या जाती संवेदनशील असून जवळपास 300 हून अधिक पक्ष्यांना संवर्धनाची गरज आहे. मागील 8 वर्षात सुमारे 80 टक्के पक्ष्यांच्या जाती घटल्याचे निदर्शनात आले आहे. त्यात प्रदेशनिष्ठ पक्ष्यांमध्येही तितकीच घट झालेली आहे. साध्या सवई बदलल्यानेसुद्धा मोठा फरक पडू शकतो.
जनजागृती सोबत कर्तव्यदक्षता ही तितकीच महत्वाची, नाही का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -