घरफिचर्सस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Subscribe

1897 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड याचा खून केला.

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर या गावी झाला. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. सावरकरांचे शिक्षण भगूर, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे एलएलबीपर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थी जीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इत्यादी साहित्याचा समावेश त्यात होता.

1897 मध्ये पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड याचा खून केला. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. 1899 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले. त्यांनी जानेवारी 1900 मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली.

- Advertisement -

त्यांच्याभोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी गोविंद यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणार्‍या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. पुढे 1904 मध्ये या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ या संस्थेत झाले. गनिमी काव्याच्या धोरणाने सैन्यात व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे, रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे, इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे, शस्त्रास्त्रे साठवणे इत्यादी मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते. अशा या थोर क्रांतिकारकाचे 26 फेब्रुवारी 196६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -