घरफिचर्सभारतीय डॉक्टर आनंदीबाई जोशी

भारतीय डॉक्टर आनंदीबाई जोशी

Subscribe

आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा आज स्मृतिदिन. आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणार्‍या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने त्यांच्याहून २० वर्षांनी मोठे असणार्‍या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता येथे बदली झाली. ते एक पुरोगामी होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता.

आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळाला. सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले.

- Advertisement -

तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले. आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईनी एम.डी.ची पदवी मिळवली. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री-कक्षाचा ताबा देण्यात आला. अशा या महान विदुषीचे २६ फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -