घरसणवारश्रावणात शिवकृपेसाठी तांदळाचा करा असा उपाय, होईल भरभराट

श्रावणात शिवकृपेसाठी तांदळाचा करा असा उपाय, होईल भरभराट

Subscribe

शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. त्यात तांदळाचा उपाय हा सर्वात लवकर फळ देणारा असल्याची धारणा आहे.

श्रावण महिना हा प्रभु शंकराला सर्मपित आहे. तसेच शास्त्रानुसार भगवान शंकराचा अशा देवी देवतांमध्ये समावेश होतो जे सहज भक्तावर प्रसन्न होतात. यामुळेच शंकराला भोळा सांब असेही म्हटले जाते. याचपार्श्वभूमीवर शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. त्यात तांदळाचा उपाय हा सर्वात लवकर फळ देणारा असल्याची धारणा आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार तांदळाचा उपाय केल्यास घरात सुख शांती आणि आनंदी वातावरण निर्माण होते. तसेच शंकराच्या कृपेने घरातील सगळ्यांचीच प्रगतीही होते.

- Advertisement -

सुख समृद्धीसाठी

- Advertisement -

श्रावणात दररोज शिवशंकराला ५ तांदळाचे दाणे वाहावेत. असे केल्याने धन धान्याची भरभराट होते.

धनलाभासाठी

शंकराला अक्षता वाहण्याची परंपरा आहे. पण जर शंकराला तांदूळ आणि कुंकही वाहीले तर आर्थिक अडचणी दूर होतात अशी धारणा आहे.

आकस्मिक धनलाभासाठी

श्रावणात दर सोमवारी शंकराची विधीवत पूजा करावी. दरसोमवारी शिवमूठ वाहावी. यात वेगवेगळे धान्य असतात. त्याप्रमाणे मूठभर ते धान्य घ्यावे आणि पिंडीवर वाहावे. श्रावण संपल्यानंतर हे सर्व धान्य गरजूंना दान करावे. यामुळे गरजूंचे आशिर्वाद तर मिळतातच त्याशिवाय शिवकृपा होऊन अनपेक्षित लाभही होतो.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -