घरभक्तीभगवान परशुरामांच्या जन्माची काय आहे कथा? मिळाले चिरंजिवी होण्याचे वरदान

भगवान परशुरामांच्या जन्माची काय आहे कथा? मिळाले चिरंजिवी होण्याचे वरदान

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. याचं शुभ दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. भगवान परशुरामांना श्री विष्णूंचा सहावा अवतार मानले जाते. हा श्री विष्णूचा उग्र अवतार मानला जातो. श्रीरामांच्या आधी त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला होता. असे म्हणतात की त्यांना चिरंजिवी होण्याचे वरदान मिळाले होते.

भगवान परशुरामांच्या जन्माची कथा

पौराणिक कथेनुसार, परशुराम हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी सहावा अवतार आहे. ऋषी जमदग्नी हे त्यांचे वडील होते तर देवी रेणुका त्यांची आई होती. ऋषी जमदग्नी आणि देवी रेणुका यांच्या विवाहानंतर त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला होता. या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि त्यानंतर अक्षय्य तृतीयेला भगवान परशुरामांचा जन्म झाला. ऋषी जमदग्नी यांनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले. महादेवांकडून रामाने शस्त्राचे ज्ञान प्राप्त केले यावेळी प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना आपली कुऱ्हाड म्हणजेच परशु दिला. तेव्हापासून त्यांना परशुराम म्हटलं जाऊ लागलं.

- Advertisement -

भगवान परशुराम आजही जिवंत

परशुराम जयंती 2022 जन्म कथा
भगवान परशुरामांना चिरंजीवी म्हणतात, ते आजही जिवंत आहेत. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे. त्यांनी श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले होते आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले होते. कलियुगाच्या शेवटी जेव्हा विष्णूचा कल्की अवतार जन्माला येईल, तेव्हाही परशुराम येणार असल्याचं म्हटलं जातं.


हेही वाचा :

Akshaya Tritiya 2023 : वैवाहिक जीवन सुखमय करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा ‘हे’ उपाय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -