घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धाकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुशील पेंढारी यांचं बाप्पाकडे कोरोना संपवण्याचं मागणं

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुशील पेंढारी यांचं बाप्पाकडे कोरोना संपवण्याचं मागणं

Subscribe

नालासोपारा येथे राहणारे सुशील दामोदर पेंढारी यांनी देशावर ओढावलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरस संदर्भात आपल्या बाप्पाची सजावट केली आहे. त्यांच्याकडे १० दिवसांचा बाप्पा असून यंदा त्याच्या बाप्पाचे ११० वे वर्ष आहे. सजावटीसाठी बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक आणि थर्मोकोलचा वापर आम्ही कटाक्षाने टाळलेला आहे. सर्व चित्रे देखील हाताने रेखाटली आहेत. तसेच कोरोना योद्धाना सलाम ही संकल्पना निवडून गणपतीची सजावट केली आहे, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ही सजावट करताना “कोरोना संपव रे बाप्पा” असं त्यांनी बाप्पाकडे मागणं मागितलं आहे. तसेच त्यांनी आपले मत व्यक्त करताना असे सांगितले की, आज केवळ भारत नव्हे तर जगभरातील लहान-थोर, स्त्री – पुरुष, गरिब-श्रीमंत, प्रत्येकाच्या तोंडी कोरोना हा परवलीचा शब्द झाला आहे. या भयानक महामारीचा नायनाट करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक जीवाचे रान करीत आहेत.

- Advertisement -

भारताबाबत बोलायचे झाल्यास आपल्या पौराणिक कथांमध्ये ही जेव्हा जेव्हा मानव जातीवर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा ईश्वराने अवतार धारण करून संकटांचा बीमोड केला आहे. आजही या कोरोनारुपी दैत्याचा नायनाट करण्यासाठी ईश्वराने विविध रूपांमध्ये अवतार घेऊन आपली लढाई सुरू ठेवली आहे. विविध अवतारात लढणाऱ्या या ईश्वररुपी योध्यांना मानाचा मुजरा करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न..

सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांची यादी खालीलप्रमाणे,
१) कापडी पडदे
२) फेविकोल, सेलोटेप
३) पोस्टर कलर
४) सुई धागा, सुतळी
५) रेती
६) मांजरपाट
७) लाकडी रिपा
८) सनबोर्ड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -