घरदेश-विदेशप्रेमासाठी काय पण! WhatsApp प्रेमीसाठी ३०० किमी केला प्रवास; आणि...

प्रेमासाठी काय पण! WhatsApp प्रेमीसाठी ३०० किमी केला प्रवास; आणि…

Subscribe

....पण जेव्हा तिचा 'व्हॉट्सअ‍ॅप प्रेमी' एक अल्पवयीन निघाला तेव्हा तिची स्वप्ने धुळीस मिळाली.

कानपूरमधून एक अनोखी प्रेमकथा समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलीने तिच्या ‘व्हॉट्स अॅप प्रेमी’शी लग्न करण्यासाठी तब्बल ३०० किमीचा प्रवास केला आणि ती तिच्या घरी पोहोचली. पण जेव्हा तिचा ‘व्हॉट्सअ‍ॅप प्रेमी’ एक अल्पवयीन निघाला तेव्हा तिची स्वप्ने धुळीस मिळाली. पण या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला जेव्हा या मुलीने तिच्या ‘व्हॉट्स अॅप प्रेमी’ला सोडून तिच्या मोठ्या भावाशी लग्न करण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे एलएलबी करणारी ही प्रेयसी अल्पसंख्याक समाजातील असून तिचा प्रियकर हिंदू समाजातील आहे.

सबिनाचे वडील अतिक हे शाहजहापूर येथील रहिवासी असून ते इंजीनियर आहेत. सबिनाने सांगितले की, आईच्या निधनानंतर तिच्या वडिलांनी पुन्हा दूसरे लग्न केले. तसेच, तिच्या असा आरोप आहे की, सावत्र आई तिच्यावर अत्याचार करते. सबिनाच्या म्हणण्यानुसार, तिची मैत्री व्हॉट्सअ‍ॅपवर कानपूरमधील पारोली गावात राहणाऱ्या अमितशी झाली होती.

- Advertisement -

सबिनाने बुधवारी आपला प्रियकर अमितशी लग्न करण्यासाठी शाहजहांपूरपासून ३०० किमी अंतरावर प्रवास केला आणि कानपूरच्या पारोली गावात त्याच्या घरी पोहोचली. या प्रवासादरम्यान, तिला अनेक किलोमीटर चालत देखील जावे लागले आणि जाता जाता लोकांच्या मदतीने तिने बसचे तिकिट देखील खरेदी केले. पण तेथे जेव्हा पोहोचल्या नंतर तिला समजले की अमित हा अल्पवयीन आहे, तेव्हा तिचं लग्नाचं भूत उतरलं. सबिना २४ वर्षांची आहे आणि अमित तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असून आता सबिना अमितच्या घराबाहेर तळ ठोकून बसली आहे.

सबिनाने असेही सांगितले की, मी अमितशी लग्न करायला आली होती. त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की, अमित माझ्यापेक्षा लहान आहे. तसेच, त्याचा मोठा भाऊ अविवाहित आहे. म्हणून मी त्याला सांगितले आहे की मी अमितच्या मोठ्या भावाशीही लग्न करण्यास तयार आहे, परंतु मी माझ्या घरी जाणार नाही, कारण मला तिथे धोका आहे.

- Advertisement -

तर अमितचे असे म्हणणे आहे की व्हॉट्सअ‍ॅपवर सबिनाशी माझी मैत्री होती, पण लग्न करण्याविषयी काहीही बोलले गेले नाही. अमितने असेही म्हटले आहे की, सबिनाने व्हॉट्सअ‍ॅपवर तिचे नाव रिया सांगितले होते. माझे वय कमी आहे. तिने सरळ तिच्या घऱी जावे. गावात आल्यावर आम्ही सबिनाच्या कुटूंबाला फोन केला. पण त्यांनी तिला घरी घेण्यास नकार दिला.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -