आजचे भविष्य : सोमवार १० डिसेंबर २०१८

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- संततीची मदत घेता येईल. तुमचा मुद्दा पटवून देण्याचे काम तुमची जवळची व्यक्ती करेल.

वृषभ :- कायद्याचे पालन करा. खाण्याची काळजी घ्या. तुमच्या कामात इतर लोक ढवळा ढवळ करतील.

मिथुन :- घरातील समस्या आज सोडवा. महत्वाचे काम करण्याचा आळस करू नका. चर्चा करता येईल.

कर्क :- विरोधक तणाव करण्याचा प्रयत्न करतील. जवळचे लोक तुम्हाला मदत करण्यास येतील.

सिंह :- आजचे काम उद्यावर टाकण्याचा विचार करू नका वरिष्ठांच्या बरोबर सल्ला मसलत करता येईल.

कन्या :- कायदा समजून घेण्याची गरज असते हे लक्षात असू द्या. घरातील लोकांना खुष ठेवता येईल.

तूळ :- विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल. स्पर्धेत अव्वल रहाल. धंदा वाढेल.

वृश्चिक :- महत्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. इतरांना तुमच्या मनांतील विचार सांगावे लागतील.

धनु :- मनाची द्विधा अवस्था होईल. वरिष्ठांचा विचार मानावा लागेल. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

मकर :- धावपळ करावी लागेल. किरकोळ अडचण घरगुती कामात येईल. खर्च वाढू शकतो.

कुंभ :- आजचे काम उद्यावर टाकण्याचा विचार योग्य ठरत नाही. स्पर्धेत चमकाल. नवी दिशा मिळेल.

मीन :- अपेक्षित कामे पूर्ण करता येतील. नवे धोरण धंद्याला पोशक ठरेल. घरगुती वाद मिटेल.