घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Subscribe

मेष :- व्यवसायाची चर्चा सतकारणी लागेल. नोकरांचा प्रश्न सुटेल. खर्चावर नियंत्रण ठेवता येणे कठीण आहे.

वृषभ :- उत्साहाचा भरात अवघड काम सुद्धा सहज करून जाल. खिसापाकिट सांभाळा.

- Advertisement -

मिथुन :- कामामध्ये नकळत चूका होतील. लक्ष केंद्रीत करा. रस्त्याने विचारात चालू नका.

कर्क :- प्रेमातील तणाव दूर करता येईल. पाहुणे येतील. मोठी खरेदी संभवते.

- Advertisement -

सिंह :- जिद्द व हट्टीपणा यात फरक असतो. प्रेमाची व्यक्ती भेटण्याचे ठरवेल. आपला वचक कमी करू नका.

कन्या :- जुने येणे वसुल करा. नोकरीतील कामाचा व्याप कमी होईल. धंद्यात वाढ होईल.

तूळ :- आर्थिक लाभ होईल. खाण्यापिण्याची चंगळ करतांना प्रकृतिचा विचार करा. मोठी खरेदी संभवते.

वृश्चिक :- प्रवासात आनंद मिळेल. मित्र-मंडळींचा सहवास मिळेल. आप्तेष्ठ भेटतील. समारंभाला जावे लागेल.

धनु :- तुटक व बेजबाबदारपणे वागू नका. गैरसमज होईल. टोचून बोलण्यामुळे वाद होईल.

मकर :- कामाचे योग्य नियोजन करता येईल. ठरविलेल्या पेक्षा जास्त प्रगती होईल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ :- स्वतःच्या जवळचे पैसे इतरांनसाठी खर्च करावे लागतील. खिसा पाकिट सांभाळा. वाहन खरेदीचा विचार कराल.

मीन :- नविन मित्र-परिवार मिळेल. राजकीय घडामोडीत यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -