राशीभविष्य : शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९

horoscope daily horoscope thursday april 07 2022
राशीभविष्य

मेष : मतभेद होतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. उद्धटपणे बोलणे केल्यास प्रभाव कमी होईल. स्पर्धा कठीण.

वृषभ : अधिकारी वर्गाशी मैत्री करतांना सावध रहा. धंद्यात वाढ होईल. पोटाची काळजी घ्या. कायदा पाळा.

मिथुन : मैत्री मधून धंद्यातील समस्या सोडवता येईल. प्रेमात तणाव होईल. नोकरीत वर्चस्व दाखवू नका.

कर्क : स्पर्धेत कौतुक होईल. प्रगतीचा मार्ग शोधता येईल. धंद्यात नवे काम मिळवता येईल. कठीण काम करा.

सिंह : धंद्यात सुधारणा होईल. नातलगांची भेट होईल. वाटाघाटीत यश मिळेल. परदेशात जाण्याचे ठरवाल.

कन्या : रेंगाळत राहिलेले काम करून घेता येईल. घरातील कामे होतील. नवे कंत्राट मिळवा. स्पर्धा जिंकाल.

तूळ : रागावर ताबा ठेवा. कामांची गर्दी होईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. नको असलेली व्यक्ती भेटेल.

वृश्चिक : आज ठरविलेले काम वेळेत पूर्ण करता येईल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. जुने येणे वसूल करा.

धनु : दादागिरी करण्यात वेळ न घालवता धंद्यात वेळ खर्च करा. वरिष्ठ मदत करतील. नम्रपणे वागा.

मकर : अडचणी कमी होतील. धंद्यात वाढ करता येईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. सावधपणे व्यवहार करा.

कुंभ : आत्मविश्वास वाढेल. शेजारी तुमच्याकडे कामासाठी येईल. आराम करण्याचे ठरवाल. कंटाळा येईल.

मीन : घरातील व्यक्तीला खुष कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. कला क्षेत्रात रमाल. प्रेम कराल.