मेष : उत्साह वाढवणारी घटना घडेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नवे मित्र मिळतील. मान-सन्मान मिळेल.
वृषभ : वेळ प्रसंगानुरूप तुम्हाला कामात बदल करावा लागेल. धंदा मिळेल. प्रवासात घाई करू नका.
मिथुन : घरातील व्यक्तीची नाराजी दूर करण्यासाठी चांगली योजना ठरवता येईल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा.
कर्क : सकाळी वादविवाद होईल. कामात जास्त कष्ट घ्यावे लागतील. कठोर बोलणे टाळा. नोकरांची बाजू ऐकून घ्या.
सिंह : महत्वाचे काम लवकर करून घ्या. दुपारनंतर अडचणी येऊ शकतात. घरातील व्यक्ती मदत करतील.
कन्या : वृद्ध व्यक्तीची चिंता कराल. घरातील समस्या वाढेल. खर्च होईल. धंद्यात तडजोडीची भूमिका घ्यावी लागेल.
तूळ : कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर कामात गोंधळ होऊ शकतो. महत्वाची वस्तु जागेवर ठेवा.
वृश्चिक : किरकोळ कारणाने तणाव होईल. समजूतदारीने वागा. प्रतिष्ठेवर टिका होईल. खाण्याच्या बाबतीत तडजोड करावी लागेल.
धनु : कोर्टाच्या कामात यश मिळेल. गैर-समज दूर करता येईल. जमिन, घर, यासंबंधी काम करता येईल. धंदा मिळेल.
मकर : तुमच्या कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल. येणे वसुल करा. नवीन परिचय होईल. स्पर्धा जिंकाल.
कुंभ : तुमच्यावरील आरोप दूर करता येईल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.
मीन : सकाळी घरात तणाव होईल. घरातील वाटाघाटीत चर्चा करताना शब्द नीटपणे वापरा. चुकून कठोर शब्द निघेल.