राशीभविष्य: शुक्रवार २० मे २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष :- संतंतीची मदत घेता येईल. त्यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. प्रवासात परिचय होईल.

वृषभ :- तुमच्या धंद्यात वाढ करता येईल. मित्राची मदत घेता येईल. घरातील व्यक्तींचा सहवास मिळेल.

मिथुन :- आत्मविश्वास वाढेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रगती होईल. घरातील ताण-तणाव कमी होईल.

कर्क :- व्यवसायात जम बसेल. मागील येणे वसूल करा. मौज-मजा कराल. खरेदी कराल.

सिंह :- तुमच्या मनाचा तोल सावरा. प्रश्न सोडवता येईल. हार मानू नका. मैत्री सांभाळा.

कन्या :- कुणालाही कमी समजू नका. कायद्याचे पालन करा. रागावर ताबा ठेवा. वाहन हळू चालवा.

तूळ :- तुमच्या मनातील कामे करून घ्या. कलाक्षेत्रात मन रमेल. प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख होईल.

वृश्चिक :- जुने मित्र भेटतील. वेळेला महत्त्व दिल्यास कामे जास्त पूर्ण होतील. आवडीचे पदार्थ खाल.

धनु :- कोणताही प्रश्न रागाच्या भरात सोडवता येत नाही. तडजोड करण्याची वेळ येईल.

मकर :- वाहनाचा वेग वाढवू नका. रागावर ताबा ठेवा. दुखापत होऊ शकते. कष्ट पडतील.

कुंभ :- घरातील समस्या कमी होतील. जवळच्या व्यक्तीला मदत करावी लागेल. खर्च वाढेल.

मीन :- विरोध होईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. किरकोळ वाद जास्त वाढवू नका.