घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार १२ नोव्हेंबर २०२२

राशीभविष्य: शनिवार १२ नोव्हेंबर २०२२

Subscribe

मेष : तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. धंद्यात वाढ होईल. मोठे कंत्राट मिळवा. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृषभ : प्रवासात घाई करू नका. महत्त्वाचे काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. रागावर ताबा ठेवा.

- Advertisement -

मिथुन : नोकरीत तणाव होईल. कामात चूक करू नका. प्रवासात घाई नको. संयमाने वागा. कलेत मन रमेल.

कर्क : प्रतिष्ठा सांभाळता येईल. धंद्यातील चर्चा संयमाने करा. विरोधकांना तुमच्या बाजूने वळवता येईल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

सिंह : ताणतणावाचा सामना करावा लागेल. मन स्थिर ठेवता येईल. अवमान होणार नाही त्याकडे लक्ष ठेवा. धंदा वाढेल.

कन्या : विरोधकांना शह देण्यासाठी तुमचा उपयोग वरिष्ठ करतील. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

तूळ : जमीन, घर यासंबंधी कामे निर्माण होतील. पोटाची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत होऊ शकते.

वृश्चिक : घरातील कामे होतील. कार्याला वेग येईल. धंद्यात गोड बोला. नवीन ओळखी होतील. प्रतिष्ठा मिळेल.

धनु : प्रतिष्ठीत व्यक्तींची ओळख होईल. प्रतिष्ठा मिळेल. गैरसमज होईल. वाटाघाटीचा प्रश्न सोडवा.

मकर : महत्त्वाचे काम रेंगाळत ठेऊ नका. योग्य निर्णय घेता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंदा मिळेल.

कुंभ : आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. किरकोळ कारणाने गैरसमज निर्माण होईल. नोकरीत काम वाढेल.

मीन : महत्त्वाचे काम होईल. केस जिंकाल. चर्चा यशस्वी होईल. बोलताना वाहवत जाऊ नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -