राशीभविष्य: शनिवार २३ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुमच्या कामाचा व्याप वाढेल. विरोध करणारे लोक एकी करण्यासाठी तुमच्याकडे येतील. धंद्यात वाढ होईल.

वृषभ : कठीण काम करून घेता येईल. नोकरी लागेल. धंद्यात फायदा होईल. नोकरांना सांभाळून ठेवा.

मिथुन : प्रसंगावधान ठेवा. तुमचे काम होईल. राग वाढवू नका. प्रवासात घाई करू नका.

कर्क : किरकोळ कारणाने तुमचे मत बदलू शकते. खर्च वाढेल. घरगुती कामे वाढतील.

सिंह : दुपारनंतर कामे वेगाने होतील. धंद्यात गोड बोला. कला-क्रीडा क्षेत्रात जिंकाल. थकबाकी घ्या.

कन्या : वाहनाचा वेग कमी ठेवा. रस्त्याने चालताना चौफेर लक्ष ठेवा. कायदा मोडू नका. वाद नको.

तुला : कामे करताना नीट अंदाज घ्या. वरिष्ठांना मदत करावी लागेल. कल्पनाशक्ती वाढेल.

वृश्चिक : तुमच्या कार्याचा विस्तार करणारी चर्चा सफल होईल. पदाधिकार स्वीकाराल. मित्र मिळतील.

धनु : सामाजिक कार्यात मोठा सहभाग घ्याल. आप्तेष्ठ भेटतील. धंद्यात नवा पर्याय समोरून येईल.

मकर : कोर्ट केस संपवण्याविषयी चर्चा करता येईल. योग्य सल्ला मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

कुंभ : जिद्दीने तुम्ही तुमचे मत व्यक्त कराल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. यांत्रिक बिघाड होईल.

मीन : घरगुती कामे करण्यास आळस करू नका. जवळच्या व्यक्तीला दुखवू नका. प्रेमात वाद होईल.