Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य रविवार, २० फेब्रुवारी ते शनिवार, २६ फेब्रुवारी २०२२

रविवार, २० फेब्रुवारी ते शनिवार, २६ फेब्रुवारी २०२२

Subscribe

मेष :- रविवार तुमचे विचार सर्वांना पटवून देता येतील. धंद्यात वाढ होईल. नव्या पद्धतीने सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. मकरेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार पटतील. एकी करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल अशी आशा निर्माण होईल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. ओळखीचा फायदा होईल. घरातील किरकोळ वाद सप्ताहाच्या शेवटी होऊ शकतो. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. नोकरीत प्रभाव वाढेल. कोर्ट केसमध्ये सावध रहा, मुद्दा मिळेल. विद्यार्थ्यांनी चांगली संगत व चांगला अभ्यास करावा. तरच यश येईल. शुभ दि. २०,२३

वृषभ :- रविवार धंद्यात वाढ होईल. घरगुती कामे वाढू शकतात. सामाजिक कार्यात नम्रता ठेवल्यास प्रसिद्धी मिळेल. मकरेत बुध, शुक्र गुरु युति होत आहे. या सप्ताहात तुमचे कठीण काम करण्यात यश होईल. जिद्द ठेवा. राजकीय-सामाजिक कार्यात योजनांना महत्त्व द्या. धंद्याला नवीन दिशा मिळेल. मोठे काम मिळवता येईल. घरातील वाद संपवता येऊ शकतो. प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. मोठ्या कामाचे कौतुक होईल. साहित्यात मन रमेल. कोर्ट केसमध्ये जिंकता येईल. नोकरी मिळू शकेल. परदेशात जाण्याचा योग येईल. विद्यार्थी वर्गाने मौज-मजा करून जास्त वेळ अभ्यासात खर्च करावा. शुभ दि. २१, २२

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा होईल. काम करताना एकाग्रता करा. घरात किरकोळ वाद होईल. धंद्यात हिशोब नीट तपासा. मकरेत बुध प्रवेश, चंद्र मंगळ त्रिकोणयोग होत आहे. मनाचा विश्वास कायम ठेवा. विचारपूर्वक राजकीय-सामाजिक कार्यात निर्णय घ्या. आरोप येईल. खर्च होईल. धंद्यात सावधपणे करार करा. जास्त मोह ठेऊ नका. फसगत टाळण्याचा प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात यश थोडे लांब राहील. प्रसिद्धीला थांबावे लागेल. कोर्ट केसमध्ये अडचणी येतील. मुद्दा हुशारी मांडा. नोकरीत तणाव होईल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवावी. अभ्यासाशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ दि. २२,२३

कर्क :- रविवार मन विचलित होईल. सहनशीलता ठेवा. धंद्यात खर्च होईल. पैसे नीट मौजून घ्या. वाहन जपून चालवा. मकरेत बुध, प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यातील ताण-तणाव कमी करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांना तुमचे विचार पटतील. धंद्यात नवा विचार उपयोगी पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. नोकरी लागेल. बदल करता येईल. कोर्ट केसमध्ये चांगला बदल घडेल. कायद्याचे पालन करा. सप्ताहाच्या शेवटी शुभ समाचार मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घर, वाहन, खरेदीचा विचार कराल. शुभ दि. २३,२४

- Advertisement -

सिंह :- रविवार तुमच्या विचारांना चालना मिळेल. धंद्यात लगेच बदल करण्याची घाई करू नका. गोड बोलून तुमचे काम करून घ्या. मकरेत बुध प्रवेश, बुध हर्षल केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला उतावळेपणा करून चालणार नाही. रागाचा पारा वाढवू नका. मैत्री जोडून ठेवणे कठीण आहे. धंद्यात फसगत होऊ शकते. अति फायद्याचा मोह मनस्ताप देणारा ठरेल. घरातील समस्या वाढू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात हातात असलेले काम नेटाने करा. तडजोड करावी लागू शकते. कोर्ट केसमध्ये सावध रहा. गुप्त कारवाया होतील. विद्यार्थ्यांनी वाकड्या वाटेने जाऊ नये. शुभ दि. २४,२५

कन्या :- रविवार तुम्ही महत्वाची कामे करून घ्या. नातलगांची भेट होईल. धंद्यात जम बसेल. नवीन ओळख फायद्याची वाटेल. मकरेत बुध प्रवेश, शुक्र गुरु युति होत आहे. महत्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची मिळालेली संधी महत्वाची ठरेल. वेळेला महत्व द्या. योजना पूर्ण करा. लोकांचे आशीर्वाद मिळवा. घरात शुभ समाचार मिळेल. विवाहासाठी चांगली स्थळे मिळतील. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात नाव होईल. चांगली भूमिका मिळेल. साहित्याला चांगला विषय व प्रतिसाद मिळेल. कोर्ट केसमध्ये कायदा पाळा. यश बुद्धिचातुर्याने मिळवता येईल. विद्यार्थी वर्गाने नियमितपणा ठेवावा. अभ्यास करावा. शुभ दि. २१, २२

तुला :- रविवार तुमचा उत्साह राहील. वेगाने कामे होतील. धंद्यात लक्षपूर्वक काम करा. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळख होईल. मकरेत बुध प्रवेश, शुक्र, गुरू युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात मेहनत घ्या. वरिष्ठांची मनस्थिती पाहून मत व्यक्त करा. धंद्यात सावधपणे करार करा. त्यातील खाचा-खोचा समजून घ्या. मुलांचे भवितव्य ठरविण्यात यश होईल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. पुरस्कारासाठी थांबावे लागेल. नोकरीत तुमचे काम वाढेल. उतावळेपणा नको. पुढे तारीख घ्या. साहित्यात मन लागेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. प्रकृतीची काळजी घ्यावी. घरगुती वातावरण तुम्ही आनंदी ठेऊ शकाल. प्रवासाचा बेत ठरवाल. शुभ दि. २१, २४

वृश्चिक :- रविवार कामाची गर्दी होईल. अनेक विचारांनी मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यात भावना आणल्यास गुंता वाढेल. मकरेत बुध प्रवेश, शुक्र गुरू युति होत आहे. सोमवारपासून तुमची मनस्थिती स्थिर होईल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनापूर्तीकडे लक्ष द्या. सरकारी, नेते यांचे सहकार्य उत्तम मिळेल. धंद्यात मोठे काम घ्या. स्वतःच्या कामाकडे अधिक लक्ष पुरवा. कला-क्रीडा क्षेत्रात कल्पनाशक्तीचा प्रभाव दाखवता येईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कोर्ट केस यशस्वी होईल. नोकरीत तुमचे कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाने आळस सोडून ध्येय गाठावे. शुभ दि. २२, २३

धनु :- रविवार आजचे काम आजच करण्याची तयारी ठेवा. भेट यशस्वी होईल. धंदा वाढेल. गोड बोलून उधारी वसूल करा. मकरेत बुध प्रवेश, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात धावपळ होईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात तुम्हाला नवीन काम मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. आळस करू नका. घरगुती समस्या येतील. प्रकृतीची काळजी घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात संंमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. कोर्ट केस कठीण वाटेल. नम्रता ठेवा. साहित्यात विचारांना चालना मिळेल. प्रसिद्धीचा विचार करू नका. विद्यार्थ्यांनी सकस आहार घ्यावा. शुभ दि. २३, २४

मकर :- रविवार घरातील कामे करून घ्या. आजचे काम उद्यावर टाकू नका. धंद्यात फायदा होईल. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र गुरू त्रिकोण योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडून राहिलेले काम पूर्ण करता येईल. व्यक्तींच्या भेटी घेऊन कार्याला आर्थिक सहाय्य मिळवता येईल. चर्चा मनाप्रमाणे होईल. घरातील खर्च वाढेल. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. मैत्रीने फायदा होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्ट केसमध्ये पद्धतशीर बोला. जमीन, घर, वाहन खरेदी कराल. नोकरीत चांगला बदल होईल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासात जास्त लक्ष द्यावे. परदेशात जाण्याची संधी मिळेल. शुभ दि. 25, २६

कुंभ :- रविवार महत्वाची भेट, चर्चा यात यश मिळेल. आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. धंद्यात फायदा होईल. मकरेत फायदा होईल. मकरेत बुध प्रवेश, बुध हर्षल केंद्र योग होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा अंदाज मागे पुढे होईल. निर्णयात तफावत होईल. सावध रहा. आरोपांचे खंडन करण्यात मनस्ताप होईल. धंद्यात विचारपूर्वक करार करा. उतावळेपणाने पैसे गुंतवू नका. मोहाला दूर ठेवा. घरगुती समस्या किरकोळ असतील. जमिनीसंबंधी कामे वाढतील. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. कोर्ट केसमध्ये अडचणी येतील. कायद्याचे पालन करा. विद्यार्थ्यांनी उद्धटपणे बोलू नये. अभ्यास करावा. शुभ दि. २३, २४

मीन :- रविवार तुमचा धंदा जोरात चालेल. निर्णय अचूक घेतल्याने समस्या येणार नाही. नवीन लोकांची मदत मिळू शकेल. मकरेत बुध प्रवेश, शुक्र, गुरू युति होत आहे. राजकीय-सामाजिक कार्यात महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. वरिष्ठांना तुमचे विचार पटवून देता येईल. सप्ताहाच्या मध्यावर वाहन जपून चालवा. वाद वाढेल, त्याकडे लक्ष घ्या. घरातील माणसांचे मन राखता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन काम मिळेल. धंद्यात मोठी उडी घेता येईल. गुंतवणूक करणारे भेटतील. कोर्ट केस संपवण्यास यश येईल. विद्यार्थ्यांनी इतर विषय न करता अभ्यासच करावा . नोकरी मिळेल. शुभ दि. २१, २२

 

- Advertisment -