घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २७ मार्च २०२४

राशीभविष्य : बुधवार २७ मार्च २०२४

Subscribe

मेष – कला-क्रीडा क्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. नवीन परिचय धंद्यासाठी उपयुक्त ठरेल. कोर्ट केस जिंकाल.
वृषभ – नातलगांच्या भेटीगाठी होतील. दिवस आनंदात जाईल. धंदा महत्त्वाचा आहे त्यावर लक्ष द्या. स्पर्धेत पुढे जाल.
मिथुन – रस्त्याने चालताना सावधगिरी बाळगा. खर्च वाढेल. वादाला महत्त्व देऊ नका. रागावर ताबा ठेवा. शांत राहा.
कर्क – घरातील वातावरण आनंदी राहील. घरातील सदस्यांसाठी मोठी खरेदी कराल. व्यवसायात नवीन काम मिळेल.
सिंह – सामाजिक कार्यात मान-अपमानाचा विचार करू नका. कार्य करत राहा. किरकोळ तणाव व समस्या होईल. यश मिळेल.
कन्या – नवीन ओळख होईल. कला-क्रीडा स्पर्धेत कष्ट घ्या. व्यवसायाला कलाटणी मिळेल. नवे काम मिळेल. तब्येत सांभाळा.
तूळ – सामाजिक कार्यात कामाचा व्याप वाढेल. काम करताना घाई करू नका. लोकांचे सहकार्य मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृश्चिक – राजकीय क्षेत्रात तुमचा अंदाज बरोबर येईल. कामात आळस करू नका. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कष्ट घ्या.
धनु – अपेक्षा असलेली व्यक्ती भेटल्याचे समाधान मिळेल. थोरा-मोठ्यांचा सहवास मिळेल. घरातील कामे मार्गी लागतील.
मकर – तुमच्या नव्या विचारांना चालना मिळेल. कल्पना कृतीत उतरवण्याची संधी मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ – उतावळेपणा न करता तुमचे विचार मांडा. विलंबाने तुमचे काम होईल. धीर ठेवा. सामाजिक कार्यात लोकांचे प्रश्न मार्गी लावाल.
मीन – घर-वाहन खरेदीबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेता येईल. थकबाकी वसूल करा. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात नवे काम मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -