Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार २६ मार्च २०२४

राशीभविष्य : सोमवार २६ मार्च २०२४

Subscribe

मेष – तुमच्या कामात प्रगती होईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. दुसर्‍यांना सन्मानाने वागवा.
वृषभ – मनावरील ताण कमी झाल्यावर माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. स्पर्धेत पुढे जाल. नवे मित्र जोडले जातील.
मिथुन – दुसर्‍यावर दबाव टाकून काम करून घेणे सोपे नाही. वाद वाढेल. वाहन जपून चालवा. धंद्यात नवे काम मिळेल.
कर्क – घरातील कामे करून घेता येतील. घरातील सदस्यांकडून प्रेम मिळेल. आळस करू नका. धंद्यात फायदा होईल.
सिंह – सामाजिक कार्यात विरोध सहन करण्याची तयारी ठेवा. चिडचिडेपणा केल्यास चूक होईल. वाहन जपून चालवा.
कन्या – आजचे काम उद्यावर टाकू नका. धंदा वाढेल. नोकरवर्गाची नाराजी दूर होईल. थकबाकी वसूल करा. जुने मित्र भेटतील.
तूळ – कामाचा व्याप वाढेल. सहकारी मदत करतील. दुसर्‍याचे विचार समजून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्चिक – सामाजिक कार्यात आत्मविश्वास वाढेल. नवीन विचार चांगला आहे का, हे तपासून पाहा. मित्राचा विचार होईल.
धनु – धंदा सुधारता येईल. नोकरवर्ग मदत करेल. नवे काम मिळेल. मान-सन्मान मिळेल. प्रश्न सोडवा. वेळ कमी पडेल.
मकर – तणाव, वाद मिटवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. वाटाघाटीसंबंधी चर्चा करू शकाल. घर-जमीन खरेदी करता येईल.
कुंभ – विरोधकांच्या गुप्त कारवायांचा त्रास होईल. भांडणाचे कारण काढेल. संयम बाळगा. रागावर ताबा ठेवा. शांत राहा.
मीन – आजच्या कामात यश मिळेल. उद्यावर महत्त्वाचा निर्णय टाकू नका. लोकांशी नम्रतेने वागा. धंद्यात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -