गुरू राशींमध्ये होणार वक्री; ११९ दिवस ‘या’ राशींच्या व्यक्तींनी घ्या आरोग्याची काळजी

वक्री गुरू सर्वात जास्त मीन राशीवर प्रभाव टाकणार आहे. कारण गुरू याचं राशीमध्ये असणार आहे. गुरू अंतरिक्षातील सगळ्या मोठा आणि वजनदार ग्रह आहे.

ज्योतिष शास्त्रात शुभ ग्रह मानला जाणारा गुरू ग्रह २९ जुलै पासून मीन राशीमध्ये वक्री होणार असून २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वक्री असेल. यादरम्यान, गुरू मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींसाठी याचा चांगला परीणाम पाहायला मिळणार नाही. या राशींच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रह वक्री असेपर्यंत आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. या राशीच्या व्यक्तींना २९ जुलै ते २४ नोव्हेंबकर या ११९ दिवसांमध्ये सावध राहायला हवे, तसेच ज्या व्यक्तींचे मीन आणि कन्या लग्न आहे, त्यांनी आपल्या वजनाची काळजी घ्या. या काळात तुमचे वजन वाढू शकते.

गुरूमुळे वाढणार तुमचं वजन
वक्री गुरू सर्वात जास्त मीन राशीवर प्रभाव टाकणार आहे. कारण गुरू याचं राशीमध्ये असणार आहे. गुरू अंतरिक्षातील सगळ्या मोठा आणि वजनदार ग्रह आहे. असं म्हणतात की, गुरू ग्रह जिथे बसतो तेथील जीव-जंतू दबून जातात आणि जेव्हा गुरू ग्रह जेव्हा वक्री होतात तेव्हा त्यांचा भार अधिक वाढतो.

गुरू ग्रह वक्री कन्या राशीमध्ये सुद्धा वक्री होणार आहे. यामुळे कन्या राशींच्या व्यक्तींना जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे या ११९ दिवसाच्या काळात कन्या राशींच्या व्यक्तींनी तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ यांचं सेवन कमी प्रमाणात करा.

वक्री गुरूपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

  • वक्री गुरूपासून वाचण्यासाठी तुमच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा.
  • नियमीत व्यायाम करा.

हेही वाचा : Hindu Shastra : श्रावणात करा मोरपंखाचे ‘हे’ खास उपाय; मिळेल अद्भूत फळ