Eco friendly bappa Competition
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार १० जुलै ते शनिवार १६ जुलै २०२२

राशीभविष्य रविवार १० जुलै ते शनिवार १६ जुलै २०२२

Subscribe

मेष :- या सप्ताहात शुक्र हर्षल लाभयोग, सूर्य नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. धावपळ दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात एखादे काम अडचणीत येऊ शकते. वादविवाद जास्त वाढू शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे कार्य वेगाने पुढे न्या. लोकांचे सहकार्य मिळवता येईल. नवीन विचार करून योजना बनवा. घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात संधी मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळवता येईल. गोड बोला. राग आवरा. संशोधनात प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी जिद्द सोडू नये. शुभ दि. १०, ११

वृषभ :- या सप्ताहात सूर्य चंद्र लाभयोग, बुध मंगळ, युती होत आहे. महत्त्वाच्या धंद्यातील निर्णय घेता येईल. नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ वाद संभवतो. वरिष्ठांना खूश करा. नोकरीत जम बसवून ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. प्रेमाला चालना मिळेल. संसारात शुभ समाचार कळेल. वादविवाद संपेल. संशोधनात यश मिळेल. कोर्टाच्या कामात जिंकता येईल. कटकट लवकर संपवा. विद्यार्थ्यांनी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घर खरेदी करता येईल. शुभ दि. १२, १५

- Advertisement -

मिथुन :- या सप्ताहात बुध मंगळ युती, शुक्र हर्षल लाभयोग होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. ओळखीचा उपयोग करून घेता येईल. मागील येणे मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने प्रगती करावी लागेल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय होईल. तुमचा विचार केला जाईल. घरातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. घर, जमीन खरेदीचा विचार कराल. शेअर्सचा अंदाज फायदेशीर ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात लोकप्रियता मिळेल. लाभ मिळेल. नोकरीत टिकून राहता येईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. कोर्टाच्या कामात सप्ताहाच्या शेवटी अडचण येऊ शकते. शुभ दि. ११, १३

कर्क :- या सप्ताहात बुध मंगळ युती, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळवता येईल. अधिकारी वर्गाबरोबर नमते धोरण घ्यावे लागेल. नोकरीत काम करण्यात चूक होऊ शकते. राजकीय-सामाजिक कार्यात लोक तुमच्या विरोधात कुरबूर करतील. तुमचा राग वाढू शकतो. कायद्याचे उल्लंघन कुठेही करू नका. कला-क्रीडा क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. मोठ्या लोकांची मदत मिळणे कठीण आहे. घरातील वाटाघाटीत नाराजी होईल. आपसात तणाव होऊ शकतो. विद्यार्थी वर्गाचा मनाचा गोंधळ होईल.
शुभ दि. १२, १४

- Advertisement -

सिंह :- या सप्ताहात सूर्य नेपच्यून त्रिकोण योग, शुक्र हर्षल लाभयोग होत आहे. तुम्हाला धंद्यात तडजोड करावी लागेल. राग वाढू देऊ नका. नोकर माणसांच्या बरोबर योग्य शब्दांत बोला. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे, कार्य वरचढ राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. वाटाघाटीत फायदा होईल. संसारातील तणाव मिटवता येईल. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हाल. पुरस्कार मिळेल. नवीन ओळखी वाढतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल. संशोधनाच्या कामात प्रगती होईल. पूर्णत्व प्राप्त करता होईल. विद्यार्थी वर्गाला नवीन अभ्यासक्रम निवडणे सोपे जाईल. शुभ दि. ११, १६

कन्या :- या सप्ताहात चंद्र बुध लाभयोग, बुध मंगळ युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवाल. प्रयत्नाला यश येईल. थकबाकी वसूल करा. राजकीय-सामाजिक कार्यात नवे विचार उपयोगी पडतील. जनतेच्या गरजा ओळखून योजनांची आखणी करा. आत्ताच तुमचे स्थान मजबूत करून ठेवा. मुलांच्या प्रगतीने आनंदी व्हाल. घर खरेदी-विक्री करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे येतील. निर्णय घेता येईल. संशोधन कार्य पूर्ण होईल. विद्यार्थी वर्गाची प्रगती होईल. परदेशात नोकरीसाठी जाता येईल. शुभ दि. १०, १४

तूळ :- या सप्ताहात बुध मंगळ युती, शुक्र हर्षल लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कामांची गर्दी होईल. धावपळ करावी लागेल. धंद्यात नीट लक्ष द्या. मोठे काम मिळवता येईल. नोकरीचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल. पुढील यशासाठी कार्य वेगाने सुरू करा. घरगुती कामे होतील. घर, जमीन खरेदी-विक्री करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. परदेशात जाल. प्रेमाला चालना मिळेल. संशोधनाच्या कामात पुढे जाल. तुमचे कौतुक होईल. शुभ दि. १२, १३

वृश्चिक :- या सप्ताहात सूर्य गुरू षडाष्टक योग, बुध, मंगळ युती होत आहे. अडचणीवर मात करून धंद्यात पुढे जाता येईल. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास ठेऊन व्यवहार करू नका. घरात नाराजी व वाद होऊ शकतो. स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत सावधपणे कामे करा. राजकीय-सामाजिक कार्यात विरोधकांचा सामना करावा लागेल. जवळचे लोक फितूर होण्याची शक्यता आहे. संशोधन कार्यात अडचण येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धीसाठी झटावे लागेल. विद्यार्थी वर्गाने योग्य संगत ठेवावी म्हणजे योग्य निर्णय घेता येईल. शुभ दि. १२, १५

धनु :- या सप्ताहात शुक्र हर्षल लाभयोग, सूर्य नेपच्यून त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी धंद्यात समस्या होईल. कामगार मंडळी त्रस्त करतील. घरातील माणसे तुमच्या मदतीला येतील. घरगुती वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार केला जाईल. वरिष्ठ तुमच्यावर मेहरबानी करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नवे काम उत्साहवर्धक ठरेल. पत्नी, मुले यांच्याकडून चांगली बातमी कळेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाला प्रवेशासाठी नवा मार्ग निवडता येईल. चिकाटीने अभ्यास करा. शुभ दि. १०, १३

मकर :- या सप्ताहात चंद्र बुध लाभयोग, बुध मंगळ युती होत आहे. धंद्यात बोलणी यशस्वी होतील. मोठे कंत्राट मिळवता येईल. घरगुती वातावरणात नाराजी वाटेल. खर्च वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात दादागिरी केल्यास नाव खराब होईल. सौम्य धोरण ठेवा. प्रसंगानुरूप निर्णय घ्या. प्रत्येक ठिकाणी कायद्याचे पालन करा. नोकरीत वरिष्ठांची नाराजी होऊ देऊ नका. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण राहील. संशोधनाच्या क्षेत्रात इतरांचे मत ऐकून घ्या. मेहनत जास्त होईल. विद्यार्थी वर्गाने मोठ्या लोकांचा सल्ला घ्यावा. प्रवेशात गोंधळ होऊ शकतो. शुभ दि. १५, १६

कुंभ :- या सप्ताहात शुक्र हर्षल लाभयोग, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. व्यवसायात चर्चा करताना सौम्य धोरण ठेवा. व्यावहारीक दृष्टीकोन समजून घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा विचार सर्वत्र मान्य होईल. लोक मदत करतील. प्रेरणा देणारी होईल. लोक मदत करतील. प्रेरणा देणारी घटना घडेल. संसारात आनंदी घटना घडेल. खरेदी कराल. घर, जमीन खरेदीचा विचार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ मिळेल. नोकरीत चांगला बदल शक्य होईल. परदेशात जाण्याचा योग येईल. संशोधन कार्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल. आळस करू नये. शुभ दि. ११, १२

मीन :- या सप्ताहात शुक्र हर्षल, लाभयोग, बुध मंगळ युती होत आहे. नवीन ओळख धंद्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मोठे काम मिळेल. नोकरीत जम बसेल. राजकीय-सामाजिक कार्यात योजनेला योग्य दिशा देता येईल. जुना वाद मिटवून प्रगतीचा मार्ग घेता येईल. संसारात कुटुंबासाठी फायद्याची योजना बनवाल. मुले आनंद देतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. साहित्याला नवा विषय मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. अविवाहितांनी स्थळे शोधावी. शोधकार्यात वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. मनाप्रमाणे बदली घेता येईल. परीक्षेत चांगले यश मिळेल. शुभ दि. १२, १६

- Advertisment -