सकाळी उठल्यावर चिडचिड होतेय का ? वापरा ‘या’ टिप्स

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकला चिडचिड होतेच अस नाही. पण काही लोक आहेत ज्यांना सकाळी उठल्यावर खूप ताण येतो. सकाळी का होते चिडचिड यामागचे नेमके कारण काय ? हे आपल्याला माहित नसते. तसेच ज्या लोकांची सकाळी उठल्यावर चिडचिड नेहमी होते अशा लोकांना कोणत्यातरी आजाराची लक्षणे देखील असू शकतात.

चिडचिड होण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये खराब जीवनशैली, ऑफिसचे टेन्शन, खराब आर्थिक परिस्थिती, घरचे टेन्शन (tension) अशा अनेक समस्यांचा समावेश होतो. या अनेक समस्यांमुळे लोक खूप तणावाखाली (stress) राहतात. त्यामुळे, त्यांचा मूडही नेहमी खराब असतो. अशा परिस्थितीत व्यक्तीला प्रत्येक छोट्या गोष्टीचा राग येऊ लागतो तसेच चिडचिडही होऊ लागते.

Sleep Inertia: Symptoms, Causes, Treatments, and More

1. सकाळी लवकर उठावे-

सकाळी उठण्याच्या रोजच्या वेळेपेक्षा 15 मिनिटे आधीचा उठावे. 15 मिनिटे लवकर उठून संपूर्ण दिवसाचे नियोजन करा. यामुळे दिवसभरातील सर्व कामे वेळेवर होण्यास मदत होईल. व त्यामुळेही चिडचिड होण्याची बंद होते. तुम्हाला काय काम करायचे हे तुमच्या मनात स्पष्ट होईल.

2. सकाळी संगीत ऐका-

सकाळचा मूड चांगला करण्यासाठी तुमच्या आवडीचे संगीत ऐका. यामुळे तुम्हाला खूप हलकं वाटेल. संगीतामुळे मन प्रसन्न होते. यामुळे मूड सुद्धा छान राहतो.

3. मन स्वच्छ ठेवा-

दररोज 5 मिनिटे स्वत: साठी द्या. स्वत:शी संवाद साधून मन मोकळे करा. तसेच मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला थोडे हलके वाटेल आणि मन स्थिर होईल. तसेच रात्री शांत जोप लागेल, आणि सकाळी उठल्यावर चिडचिड होणार नाही.

4. सकाळी चालायला जा-

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर ताण-तणाव वाटत असेल तर थोडा वेळ बाहेर फिरायला जा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तसेच तुमचा ताण कमी होण्यासही मदत होईल. आणि तुमची चिडचिड कमी होईल.

5. रात्री चांगली झोप घ्या-

चांगलं आरोग्य हवं असेल तर चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. तसेच तुमचे मनही शांत राहते.


हेही वाचा :  Parenting Tips: तुमचे मुलं रात्रभर झोपत नसेल तर ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करु नका