घरलाईफस्टाईलपचनशक्ती चांगली राहण्यासाठी 'हे' करा

पचनशक्ती चांगली राहण्यासाठी ‘हे’ करा

Subscribe

पचनशक्तीवर उपाय घरगुती उपाय

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांना पचनशक्तीचा त्रास उद्धभवत असतो. मात्र, काही केल्या पचनशक्ती काही वाढवता येत नाही. आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होईल. यासाठी काही वेगळे करण्याची गरज नाही. कारण दैनंदिन आहारात काही गोष्टींचा वापर केल्यास तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते.

आले

- Advertisement -

आल्यामध्ये पचनशक्ती सुधारण्याचे आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे आले हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. शरीरातील पतनक्रियेचा वेग वाढण्याचे काम आले करते. त्यामुळे आल्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

लसूण

- Advertisement -

लसूण ही औषधी असून यामध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारे अनेक घटक असतात. लसणाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे जेवणाच्या आधी लसणाच्या दोन तीन पाकळ्या खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

दालचिनी

दालचिनी हा मसाल्यातील एक प्रकार असला तरी हा मसाल्यापूर्ता मर्यादित नाही. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होतो. दालचिनीमध्ये असलेल्या मँगेनीजमुळे शरीराची काळजी आपोआप घेतली जाते. तसेच रक्तशर्करेचे प्रमाण समतोल राखण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते.

कोबी

कोबीमध्ये सल्फरचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्या सल्फरमुळे शरीर साफ होण्यास मदत होत असते.

बीट

बीटामध्ये आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे शरीराला उपयुक्त असणारे अनेक घटक असतात. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी बीट उपयुक्त ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -