घरमहाराष्ट्रशिष्यवृत्ती परीक्षेत मोठ्या चुका

शिष्यवृत्ती परीक्षेत मोठ्या चुका

Subscribe

शिक्षकाकडून संताप, विद्यार्थी गोंधळात

16 फेब्रुवारीला झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीच्या मराठीच्या व आठवीच्या गणिताच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिकेतील चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. स्कॉलरशीपच्या परीक्षेतील या चुकांमुळे गोंधळात असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षक व पालकांना अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षक व पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

विद्यार्थ्यांची ज्ञानकक्षा रुंदावून समयसूचकता, निर्णयक्षमता, अचूकता, एकाग्रता, तर्कता अशा नानाधिव नैतिक मूल्यांचा विकास करणारी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच असते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही शिष्यवृत्तीची स्पर्धा परीक्षा म्हणजे भविष्यकालीन स्पर्धा परीक्षेतील यशाचे दालन खुले करणारी असते. त्यामुळे ही परीक्षा देण्याकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल असतो. परंतु नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेत जाहिरातीवरून विचारलेल्या ‘सेलचा कालावधी’ या प्रश्नाचे उत्तरच पर्यायामध्ये नाही.

- Advertisement -

तर त्याच प्रश्नपत्रिकेत गणित विभागात ‘5 रुपयांच्या किती नोटा होत्या?’ याचे उत्तरच पर्यायात दिलेले नाही. त्याचप्रमाणे आठवीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत ‘अत्यंत पराक्रमी पण उग्र मनुष्य’ या प्रश्नात अलंकारिक शब्द अधोरेखित केलेला नाही. या असंख्य चुकातून इयत्ता आठवीचा गणित हा विषयही सुटलेला नाही. आठवीच्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये तर कहरच केला आहे. ‘अक्षय’ ऐवजी ‘अक्षर’ लिहिण्यात आले आहे. अशा नानाविध चुकलेल्या घोळाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झालेला स्पष्टपणे दिसून आला.

कष्ट करणारा शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिवेणी घटकांचे या प्रश्नपत्रिकेतील चुीच्या प्रश्नांमुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. वर्षभर मेहनत करून शिक्षक आणि पालक आपल्या मुलाला परीक्षेसाठी समर्थ करतात. मात्र या प्रश्नपत्रिकेच्या घोळामुळे मनावर नैराश्याचे सवाट पसरते. या परीक्षेसाठी इतकी मेहनत घेऊन काय उपयोग या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पालक व शिक्षक असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील चुका टाळण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

तज्ज्ञांचे सहकार्य घ्या
प्रश्नपत्रिकेतील प्रत्यके प्रश्नांची पर्यायासहित चाळणी करणे अपेक्षितच आहे. मग इतका गोंधळ उडणार नाही. तसेच मराठी शाळेतील तज्ज्ञ शिक्षकांचे सहकार्य घ्या. जेणेकरून प्रश्नपत्रिकेत चुका होणार नाहीत, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -