घरलाईफस्टाईलया मेडीकल गॅझेट्सनी घरच्या घरी करा मेडीकल चेक अप

या मेडीकल गॅझेट्सनी घरच्या घरी करा मेडीकल चेक अप

Subscribe

देशात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे वैध कारण असेल तरच बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे जे शरिराचं नियमित चेकअप करतात त्यांना करता येत नाही. तसं या आरोग्य संकटाच्या काळात तुम्ही घरच्या घरी चेक अप करु शकता. कमी किंमतीच्या गॅझेट्समुळे जी रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, श्वसनाचे ठोके, पल्स रेटची माहिती मिळेल.

पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटरने हृदयाची तपासणी करा

स्मार्टफोनमधील अॅपच्या मदतीनं पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटरने आपण इसीजी तपासू शकता आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यावर नजर ठेवू शकता.

- Advertisement -

स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक रक्तदाब मॉनिटरने रक्तदाब तपासा

स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक रक्तदाब मॉनिटरने तुम्ही तुमचा रक्तदाब तपासू शकता. यामध्ये तुम्ही नाडीचा ठोके देखील तपासू शकता.

फिंगरटिप पल्स ऑक्सिमीटरने रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळी जाणून घ्या

ऑक्सिमीटर आपल्या श्वासोच्छवासाच्या दरासह आपल्या रक्तात ऑक्सिजन प्रवाहाचे प्रमाण देखील मोजतो. हे एक लहान आणि परवडणारे डिव्हाइस आहे. या मशीनमध्ये हाताचं एक बोट टाकून तुम्ही रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजू शकता.

- Advertisement -

ग्लूकोमीटरने रक्तातील ग्लुकोज तपासा

ग्लूकोमीटर रक्तातील ग्लूकोजची पातळी मोजतो. पण याची सर्वांना गरज भासू शकत नाही. जर आपल्याला किंवा आपल्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याला मधूमेह असेल त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे.

मेडिकल अ‍ॅलर्ट सिस्टम

मेडिकल अ‍ॅलर्ट सिस्टम ही तुमच्या घरामधील वडीलधाऱ्यांसाठी एक चांगलं गॅझेट आहे. वडीलधाऱ्या व्यक्तिंना अस्वस्थ वाटलं तर ते एक बटण दाबून आपल्याला मदतीसाठी कॉल करू शकतात. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फोन शोधणे आणि नंबर डायल करण्याऐवजी हे गॅझेट चांगलं आहे.

कॉन्टॅक्टलेसलेस IR थर्मामीटर

कोरोनाच्या संकटात या थर्मामीटरचा सर्वाधिक उपयोग केला जात आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -