घरलाईफस्टाईलतुम्हीसुद्धा पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर करता का? आजच थांबा अन्यथा...

तुम्हीसुद्धा पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर करता का? आजच थांबा अन्यथा…

Subscribe

अलीकडच्या काळातील व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना घरचा पौष्टिक आहार मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे अनेकजण बाजारतील पॅकबंद अन्नपदार्थांचा वापर करत आहेत. कामात व्यस्त असल्यामुळे भूक लागल्यावर अनेकजण पॅकबंद अन्नपदार्थ खाणं पसंत करतात. मात्र, याचं पॅकबंद अन्नपदार्थांचा तुमच्या आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? नुकत्याच समोर आलेल्या एका अवहालात पॅकबंद अन्नपदार्थांमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

पॅकबंद अन्नपदार्थांमुळे वाढतोय मृत्यूचा धोका
समोर आलेल्या अवहालानुसार, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थांचे सेवन केल्याने अकाली मृत्यूचा धोका वाढला आहे. या अन्नपदार्थांमध्ये शीतपेय, आईस्क्रीम, चिप्स, ब्रेड, पाव यांचा देखील समावेश आहे. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेटिव्ह मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे 2019 मध्ये ब्राझीलमध्ये जवळपास 57,000 व्यक्तींचा अकाली मृत्यू झाला आहे. संशोधकांच्या मते, अनेक देशांमधील लोक ताज्या अन्नपदार्थांऐवजी पॅकबंद अन्नपदार्थांना पसंती देऊ लागले आहेत. मात्र, यामुळे अनेक आरोग्य समस्या देखील निर्माण होऊ लागल्या आहेत.

- Advertisement -

पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये साखरेचा अधिक वापर
पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. कारण हे पदार्थ जास्त काळ टिकावे त्यामुळे त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

 

- Advertisement -

हेही वाचा :

मुंबईत डायबिटीसमुळे वर्षभरात 14 टक्के मृत्यू; पालिकेची चिंताजनक माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -