रोगप्रतिकारशक्ती वाढवा, थंडीतही फिट राहा, आहारात करा या पिठांचा समावेश

चपाती हा भारतीय आहारातील महत्वपूर्ण पदार्थ आहे. भारतीय जेवणाची व्याख्याच ही भाजी, पोळी, डाळ, भात, कोशिंबीर, पापड अशी सुरू होते. चपातीमुळे जेवणाची लज्जतच वाढत नाही तर चपाती तुमच्या तब्येतीलाही फिट ठेवते. यातूनच आपल्याकडे भाजी नुसती न खाता चपातीबरोबर खाण्याची पद्धतच रुढ झाली आहे. चपाती चवीबरोबरच पोटही तंदुरुस्त ठेवते आणि रोगप्रतिकशक्तीही. पण तरीही सामान्य माणसाला काही वेगळ्या भाकरी खाणे आवश्यक आहे. ज्यात चपातीहून अधिक पोषक त्तवे असतात.

नाचणी
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण गव्हाबरोबरच नाचणी खाणेही शरीरासाठी आवश्यक आहे. विशेष करुन थंडीत रात्रीच्या जेवणात गव्हापेक्षा नाचणीची भाकरी खावी. यातील फायबर आणि कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात. तसेच ज्यांना अन्नपचनाच्या तक्रारी असतील त्यांनी आहारात नाचणीचा समावेश करावा.

मकाची भाकरी

हिवाळ्यात मक्याच्या पीठाची भाकरी खाणे फायदेशीर आहे. यात व्हिटामीन ए, सी के , बीटा-कॅराटीन आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात असते. मक्याची भाकरी खाल्यास बराचवेळ भूक लागत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.

ज्वारी-बाजरी

ज्वारी-बाजरी हा देखील आहारातील मुख्य घटक आहे. बाजरीची भाकरी बनवणे कठीण असलं तरी ती तब्येतीसाठी उत्तम आहे. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिडस, पोटॅशियम, फायबर , आयरन यासारखे न्युट्रीएंट्रस असतात. बाजरी ग्लूटन फ्री असते. तसेच यात व्हिटामीन बी, बी२ आणि बी कॉम्पेलक्स असते. या पीठाचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठ सारख्या समस्या दूर होतात.

शिंगाड्याचे पीठ
शिंगाड्याच्या पीठाचा वापर हा प्रामुख्याने नवरात्रीत उपवासासाठी करतात. यात व्हिटामीन बी , व्हिटामीन बी २ आणि बी कॉम्प्लेक्स असते. पौष्टीक गुणांनी भरलेले असते.