घरलाईफस्टाईलनाभीध्ये तेल सोडून पहा गुणकारी फायदे

नाभीध्ये तेल सोडून पहा गुणकारी फायदे

Subscribe

नाभीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल घातल्याने कोणते होतात फायदे.

बऱ्याचदा पोटात दुखत असेल तर त्यावेळी नाभीमध्ये तेल सोडले जाते. यामुळे पोट दुखीतून आराम मिळतो. मात्र, नाभीवर तेल घातल्याने एक नाही तर अनेक आजारांवर मात करु शकता. तसेच हाडे देखील मजबूत करता येतात. चला तर जाणून घेऊया नाभीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तेल घातल्याने कोणते फायदे होतात.

गायीचे तूप

- Advertisement -

गायीच्या तुपाचा धार्मिक विधीकरता वापर केला जातो. तसेच हे तूप नाभीमध्ये घालून आपण चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग देखील दूर करु शकतो. याकरता नाभीमध्ये थोडे तूप लावून शांत झोपल्यास अधिक फायदा होतो.

कडुलिंबाचे तेल

- Advertisement -

बऱ्याच जणांच्या अंगाला हिवाळ्याच्या दिवसात खाज सुटते. अशावेळी कडुलिंबाचे तेल नाभीमध्ये टाकून त्यावर हलका मसाज केल्याने शरीराची खाज कमी होते.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल एक चांगले औषध आहे. या तेलाचे काही थेंब नाभीमध्ये टाकल्याने आजारांना पळून लावण्यास मदत होते. यामुळे त्वचा देखील तजेलदार आणि टवटवीत राहते.

बदामाचे तेल

बदामाच्या तेलाचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बदामाचे तेल नाभीमध्ये टाकून त्यांनी मसाज केल्यास चेहरा टवटवीत दिसायला लागतो.

ऑलिव्ह ऑईल

जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास ऑलिव्ह ऑईलचा तुम्ही वापर करु शकता. रात्री झोपेच्या आधी नाभीमध्ये तेल टाका, यामुळे चांगला फायदा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -