घरलाईफस्टाईलगिफ्ट घेऊन नाही तर देऊन मिळतो 'परमानंद'

गिफ्ट घेऊन नाही तर देऊन मिळतो ‘परमानंद’

Subscribe

शिकागो विद्यापीठाचे अभ्यासक एड ओब्रायन यांनी सांगितले की, या अभ्यासामागील उद्देश हा हेच दाखवणे होते की, आनंद फक्त काही भेटवस्तू मिळाल्याने मिळत नाही. तर देण्यामुळे हा आनंद मिळत असतो.

आपल्याला समोरच्याने गिफ्ट म्हणून काय दिले ? हे पाहिल्यानंतरच आपण समोरच्याला काय गिफ्ट द्यायचे ते ठरवत असतो. म्हणजे गिफ्ट घेणे देणे आपल्यासाठी एक प्रकारचा व्यवहारच असतो. पण तुम्हाला माहीत आहे का ? की गिफ्ट घेण्याने नाही तर दुसऱ्याने देण्याने आपल्याला आनंद मिळतो. तो आनंद साधासुधा नाही तर ‘परमानंद’ असतो, हे आम्ही नाही तर शिकागोमधील एका विद्यापीठ सांगत आहे.

ऑलराउंडर व्हिनेगर

काय आहे हा अहवाल ?

शिकागोतील शिकागो विद्यापीठ आणि नॉर्थवेस्ट विद्यापीठाने एकत्रितपण या विषयावर अभ्यास केला आहे. ‘भेटवस्तू देण्याचा आनंद आणि त्यामागील मानसिकता’ या विषयावर हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासासाठी काही जणांची निवड करण्यात आली होती. त्यांना पाच दिवसासाठी प्रत्येकी पाच डॉलर देण्यात आले. या पैशांचा उपयोग करुन त्यांना गरजू व्यक्तिंना काही तरी देण्यास सांगितले. त्या सगळ्यांनी अशा गरजू लोकांना हे पैसे दिले. या कालवाधीतील त्यांच्या आनंदाचे मापन करण्यात आले. सहाव्या दिवशी त्यांना पैसे न दिल्यामुळे त्यांचा आनंद कमी झाला. गिफ्ट मिळण्यापेक्षा कोणाला काही देता आले नाही याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर अधिक होते. तब्बल ५ पटीने त्यांचा आनंद ओसरला होता. त्यामुळे भेटवस्तू मिळण्यापेक्षा देण्याचा आनंद हा अधिक असल्याचे या अभ्यासात समोर आले.

- Advertisement -
हे माहीत आहे का? – मुलांच्या अंथरुणावरील रजई, उशी,बाहुली ठरू शकते घातक

हा अभ्यासामागील उद्देश

शिकागो विद्यापीठाचे अभ्यासक एड ओब्रायन यांनी सांगितले की, या अभ्यासामागील उद्देश हा हेच दाखवणे होते की, आनंद फक्त काही भेटवस्तू मिळाल्याने मिळत नाही. तर देण्यामुळे हा आनंद मिळत असतो. काही लोक आपल्या खास व्यक्तिंनाच भेटवस्तू देतात. तर काही लोक वेगवेगळ्या लोकांना भेटवस्तू देत असतात. पण हा आनंद फार काळ टिकत नाही तर दुसऱ्याला दिल्याने हा आनंद वाढत असतो.

‘हेडोनिक अॅड्प्शन’चा अपवाद आहे हा आनंद

सायकोलॉजी सायन्स नावाच्या जर्नलनुसार आनंद हा काळी काळापुरताच स्थिमित असतो. म्हणजेच आनंदाची व्हॅलिडिटी ही फार फार काही तासांची असते. याला हेडोनिक अॅडप्शन म्हणतात. दुसऱ्याला काही दिल्यामुळे मिळणारा आनंद हा याला अपवाद आहे. या आनंदात लग्न, प्रेग्नंसी, प्रमोशन यासांरख्या आनंदाचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -