Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Health Tips: निरोगी शरीरासाठी आहारात धणे गुणकारी, या उत्तम पर्यायाचे जाणून घ्या...

Health Tips: निरोगी शरीरासाठी आहारात धणे गुणकारी, या उत्तम पर्यायाचे जाणून घ्या फायदे …

खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं यामुळे तहान कमी लागते.

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरस सारख्या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी आपण घरो-घरी अनेक उपाय करतो. व्यायाम,प्राणायाम,योगा,मेडिटेशन याव्यतिरिक्तसुद्धा काढा पिणे,आहारात योग्य बदल करणे, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अनेक गोळ्या औषधांचा समावेश आपण करतो. पण नुकतच कोव्हिड 19 गाईडलाइन अंतर्गत आयुष मंत्रालयाने संगितले आहे की धणे आणि गरम पाणी याचे एकत्र सेवन करणे हे निरोगी शरीराच्या आहारासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात. विटामीन अ,क तसेच कॅल्शिअम, व्हिटामीन सी, ब भरपुर प्रमाणात यामध्ये साठलेले आहे. धणे याचे शरीरसाठी होणारे गुणकारी फायदे जाणून घेऊया

- Advertisement -

फायदे
हाडांच्या दुखण्यावर प्रभावकरी औषध म्हणून धणे उपयुक्त आहे. धणे वायुनाशक, पौष्टिक, भूक वाढवणारे, पित्त रोधक आहेत. तसेच धणे शरीरात पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. हे शरीराला अत्यधिक थंडावा पुरवते आणि उष्णतेला कमी करण्यात मदत करते.रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावेत आणि सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने अंगातील उष्णता, दाह कमी होतो. मूत्रमार्गाची शुद्धी होते. वारंवार सर्दी-पडसं होत असल्यास धणे, दालचिनी, गवती चहा, तुळस आणि सुंठ यांचा काढा दिल्याने आराम पडतो. धणे किंवा कोथिंबीर शीतल असून रक्ती मूळव्याधीवर त्याचा काढा दिला जातो. धण्यापासून निघणारं तेल लहान मुलांच्या पोटदुखीवर अतिशय गुणकारी आहे. तसेच अतिसार होत असल्यासही धण्याचं पाणी प्यायल्याने आराम पडतो. खूप तहान लागली असल्यास धणे चावून खावेत किंवा धणे भिजवून ठेवलेलं पाणी प्यावं यामुळे तहान कमी लागते.


हे हि वाचा – Health Tips: कोरोनात व्हिटॅमिन ‘डी’ कमतरतेचा धोका काय? वाढीसाठी काय कराल ?

- Advertisement -