घरलाईफस्टाईलHeat Stroke : कोणत्या रुग्णांना असतो उष्माघाताचा जास्त धोका? जाणून घ्या...

Heat Stroke : कोणत्या रुग्णांना असतो उष्माघाताचा जास्त धोका? जाणून घ्या…

Subscribe

यंदाच्या उन्हाळ्यात झपाट्याने वाढणाऱ्या तापमानामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. अचानक वाढणाऱ्या या उन्हामुळेमच्या समस्या देखील वाढू शकतात. कारण हृदयविकार असलेल्या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त प्रमाणात असतो, ही स्थिती अधिक गंभीर आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. एवढेच नाही तर उन्हाळ्यामुळे अनेकांना उष्मघाताशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत आहे, तुम्ही अनेकदा ऐकले असेल की हिवाळा हा ऋतू हृदयरोग्यांसाठी वाईट ठरतो, कारण हृदयाशी संबंधित समस्या याच ऋतूत दिसून येतात. परंतु अति थंडीच नाही तर अति उष्णतेमुळे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. खरं तर एका अभ्यासानुसार, हवामानात अचानक बदल झाल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या या उन्हामुळे हृदयरुग्णांच्या समस्या जास्त प्रमाणात दिसू शकतात.

- Advertisement -

उष्माघात का होतो?
यंदाच्या उन्हाळ्यात झपाट्याने वाढणाऱ्या तापमानामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. अचानक वाढणाऱ्या या उन्हामुळे समस्या देखील वाढू शकतात. कारण हृदयविकार असलेल्या लोकांना उष्माघाताचा धोका जास्त प्रमाणात असतो, ही स्थिती अधिक गंभीर आहे. कारण जेव्हा आपण गरम तापमान असलेल्या भागात जात असतो, तेव्हा उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे तुमचे हृदय वेगाने धडधड करू लागते आणि रक्त पंप करण्यासाठी त्याला कठीण मेहनत करावी लागते, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या पृष्ठभागावर घाम येतो. परंतु जर तुमचे शरीर स्वतःला थंड करू शकत नसेल, तर सर्व ताण हृदयावर आणि इतर अवयवांवर येतो, त्यामुळे त्यांना नुकसान होते, या संभाव्य घातक स्थितीला उष्माघात म्हणून ओळखले जाते.

उष्माघाताचा जास्त धोका कोणाला असतो?
उष्माघाताचा त्रास कोणालाही होऊ शकतो, परंतु ज्या लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांचा त्रास आहे, त्यांना उष्माघाताचा जास्त धोका जास्त असतो.

- Advertisement -

हृदयरुग्णांना घाम येणे का धोकादायक मानलं जातं?
जास्त उष्णतेमुळे आपल्या शरीराला घाम येऊ लागतो. घाम येणे ही शरीराच्या तापमानाविरुद्ध नैसर्गिक प्रतिक्रिया असते. परंतु हीच गोष्ट हृदयरुग्णांसाठी धोकादायक असते. घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन त्याद्वारे शरीरातील आवश्यक खनिजेसुद्धा निघून जातात.

 

उष्माघात कसा टाळता येईल?

१. जास्त उन्हात जाऊ नका
उन्हाचा पारा दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जास्त असतो. त्यामुळे प्रयत्न करा की, या वेळी घर किंवा ऑफिसच्या आतमध्ये रहा. घरातून बाहेर जात असाल तर पाण्याची बाटली सोबत ठेवा. त्याबरोबरच उन्हापासून वाचण्यासाठी छत्री सुद्धा जवळ ठेवा.

२. जास्त पाणी प्या
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हृदयरुग्णांना त्यांच्या डॉक्टरांनी जी औषधं दिली आहेत ती, त्यांनी नियमीत घ्यायला हवी. शिवाय पाणी सुद्धा जास्त प्यायला हवं.

३. नियमीत चेकअप करा
कोणताही ऋतू असला तरीही हृदयरुग्णांना नियमीत चेकअप करायला हवे, ज्यामुळे तुम्ही तुमची काळजी योग्य पद्धतीने घेऊ शकाल.

४.व्यायाम करा
हृदयरुग्णांना हलके व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, जे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थोडे थंड तापमान असताना करावे. जर घाम वाढू लागला किंवा हृदयाचे ठोके वाढू लागले तर डॉक्टरांशी संपर्क साधा.


हेही वाचा :आयुर्वेदानुसार मातीच्या भांड्यातील पाणी का प्यावे? जाणून घ्या फायदे..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -