घरट्रेंडिंगViral Video: वाटेमध्येच सिंहिणीला पाहून बिबट्या मागच्या मागे पळाला अन् नंतर झालं...

Viral Video: वाटेमध्येच सिंहिणीला पाहून बिबट्या मागच्या मागे पळाला अन् नंतर झालं असं काही..

Subscribe

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात, याचा अंदाज येतो. साधारणपणे असे दिसून आले आहे की, बिबट्या त्याच्या वजनापेक्षा कितीतरी पटीने जास्त वजन असलेल्या प्राण्याची सहज शिकार करतो आणि त्याच्या जबड्याने ओढून शिकार झाडावर नेतो.

नवी दिल्लीः सध्या सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे अनेक प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. युजर्सना असे व्हिडीओ खूप आवडतात, ज्यामध्ये त्यांना भरपूर थ्रिल आणि मनोरंजन पाहायला मिळते. जंगलातून येणाऱ्या जंगली आणि भयानक प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्याला पाहून यूजर्स रोमांचित होताना दिसत आहेत.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात, याचा अंदाज येतो. साधारणपणे असे दिसून आले आहे की, बिबट्या त्याच्या वजनापेक्षा कितीतरी पटीने जास्त वजन असलेल्या प्राण्याची सहज शिकार करतो आणि त्याच्या जबड्याने ओढून शिकार झाडावर नेतो.

- Advertisement -

विशेष म्हणजे नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या जंगलातून चालताना दिसत आहे, ज्यामध्ये एक सिंहीण रस्त्याच्या मधोमध झोपलेली पाहायला मिळतेय. तो जे पाहतो ते पाहून घाबरतो. सिंहिणीशी लढण्याचे धैर्य एकवटण्याऐवजी बिबट्या आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आणि सिंहिणीची झोप मोडताच तिथून मागच्या मागे पळून जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Stuart Buy (@rangerstu24)


सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो यूजर्सनी त्याला लाईक केलेय. तसेच व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झालेले युजर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः Heat Stroke : कोणत्या रुग्णांना असतो उष्माघाताचा जास्त धोका? जाणून घ्या…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -