घरलाईफस्टाईलअस्थमा रोखण्यासाठी अशी घ्यावी काळजी

अस्थमा रोखण्यासाठी अशी घ्यावी काळजी

Subscribe

विशेष काळजी घेतल्यास आपण अस्थमा टाळू शकतो.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अस्थमा आणि दमा हा आजार कॉमन झाला आहे. कारण एखाद्या लहान व्यक्तीला किंवा मोठ्या व्यक्तीला कोणालाही याचा त्रास होतो. दम्याचे दुखणे म्हणजे क्रॉनिक आजार असे समजले जाते. विशेषत: थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये आभाळ भरुन आल्यावर दम्याचा त्रास होतो. तसेच अनेकांना यावेळी दम्याचे अॅटक देखील येतात. मात्र, विशेष काळजी घेतल्यास आपण अस्थमा टाळू शकतो.

उबदार बिछान्यावर झोपावे

- Advertisement -

अस्थमाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी जमिनीवर न झोपता उबदार बिछान्यावर झोपले पाहिजे. उदा. गादी, कॉटन बेडळीट, गालिचे इत्यादी.

धूम्रपान करु नये

- Advertisement -

अस्थमाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी सिगारेट्स, हुक्का यांच्याद्वारे धूम्रपान करु नये. तसेच दारु, तंबाखू यासारखी व्यसने करु नये.

धूळ आणि धुरांपासून लांब राहावे

शक्यतो प्रदूषण असलेल्या कुठल्याही वातावरणात जाऊ नये. यामुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. तसेच धूळ आणि धुरापासून त्रास होतो. त्यामुळे त्यापासून थोडे लांब रहावे.

मानसिक ताण घेऊ नये

अस्थमा असणाऱ्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे. कारण प्रचंड राग आला तर दम्याचा अॅटक येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -