घरCORONA UPDATEHome Isolation रुग्णांनी किती तासात मास्क बदलावा ? कोणती औषधे टाळावीत ?

Home Isolation रुग्णांनी किती तासात मास्क बदलावा ? कोणती औषधे टाळावीत ?

Subscribe

होम आयसोलेशनमध्ये असतानाही मास्क लावणे गरजेचे

कोरोनाच्या काळात रुग्णालयात बेडची कमतरता आहे. त्यामुळे सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनचा ( Home Isolation) सल्ला देण्यात येतो. होम आयसोलेशनमध्ये राहून आपल्या डॉक्टरांशी वेळोवेळी संपर्कात राहून कोरोनावर उपचार घेता येतात. मात्र होम आयसोलेशनमध्ये असतानीही रुग्णांनी स्वत:ची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी घरातील सदस्यांपासून दूर रहावे विशेष करुन लहान मुलांपासून. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असतानाही मास्क लावणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र मास्क वापरतानाही योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. घरीच आहोत म्हणून एक मास्क बरेच दिवस वापरला असे करुन चालणार नाही. केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांनी किती तासात मास्क बदलावा ? कोणती औषधे टाळावीत ? याविषयी सांगण्यात आले. (How many hours should patients with home isolation change the mask? What medications should be avoided?)

होम आयसोलेशनमध्ये असताना बऱ्याचदा रुग्ण घरगुती किंवा आपल्या मनाने औषधे घेतात. रुग्णांना कोणती औषधे द्यावीत हे त्याच्या प्रतिकारकशक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. अनेकदा रुग्णांकडून अझिथ्रोमायसीनची मागणी केली जाते, मात्र नियमावलीत स्पष्टपणे सांगिले आहे की, या गोळ्या वापरु नका. अशीच सूचना रेवीडॉक्स (Revidox) बाबतही आहे. गृह विलगीकरणात अझिथ्रोमायसीन आणि रेवीडॉक्स (Revidox) या औषधाचा वापर करु नये,असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

होम आयसोलेशनमध्ये असताना रुग्णांनी आवश्यक औषधे स्वत:जवळ ठेवावीत. त्याचप्रमाणे नियमितपणे मास्क वापरावा. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांनी नियमितपणे तीन पदरी मास्क वापरावा. ८  तासानंतर मास्कची योग्य विल्हेवाट लावावी. रुग्णाशी संबंधित काम करताना रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्ण यांनी दोघांनी ही एन ९५ मास्क वापरावा,असे सांगण्यात डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – भारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी, AEFI ने आरोग्य मंत्रालयाला सादर केला अहवाल

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -