घरCORONA UPDATEMaharashtra corona update: कोरोनाबाधितांची मृत्यू संख्या चिंताजनक, राज्यात गेल्या २४ तासात २८...

Maharashtra corona update: कोरोनाबाधितांची मृत्यू संख्या चिंताजनक, राज्यात गेल्या २४ तासात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात २८ हजार ४३८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव जलद होत असल्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन केला आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या २४ तासात राज्यात २८ हजार ४३८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६७९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस चढउतार होताना दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या २४ तासात २८ हजार ४३८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६९% एवढे झाले आहे. राज्यात आज ६७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ४ लाख १९ हजार ७२७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १५लाख ८८ हजार ७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ३३ हजार ५०६ (१७.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,९७,१६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,००४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात २८,४३८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,३३,५०६ झाली आहे. नोंद झालेल्या एकूण ६७९ मृत्यूंपैकी ४२२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ६१२ ने वाढली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

- Advertisement -

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

६९००२३

६४१९०९

१४३१६

२००८

३१७९०

ठाणे

५५१८२३

५१५६८३

७८५२

३१

२८२५७

पालघर

१०८५५५

९६२४५

१५६६

१२

१०७३२

रायगड

१३९९८८

१३०२९७

२४९१

७१९८

रत्नागिरी

३६७२२

२५१२४

७२९

१०८६७

सिंधुदुर्ग

२०४६५

१५३०६

५१४

४६४१

पुणे

९८०३८६

८९७७५६

१०४८३

५८

७२०८९

सातारा

१३८०४४

११६२१६

२६२७

१३

१९१८८

सांगली

१०९०१९

९०४०४

२४५२

१६१६१

१०

कोल्हापूर

९३०००

७३९९२

२८०६

१६१९९

११

सोलापूर

१४५९९२

१२२२८३

३४९२

६३

२०१५४

१२

नाशिक

३७१२२६

३४७५९६

४१३६

१९४९३

१३

अहमदनगर

२२७७२१

२०५४८५

२४९०

१९७४५

१४

जळगाव

१३२९७५

१२०४२८

२२६३

३२

१०२५२

१५

नंदूरबार

३८१२८

३५२१७

७५४

२१५४

१६

धुळे

४२७३६

३८९३५

४९७

१२

३२९२

१७

औरंगाबाद

१४०९१५

१३०७०१

२२९३

१४

७९०७

१८

जालना

५४६८९

४९१७५

८५१

४६६२

१९

बीड

७७९२४

६५२२१

१५१७

१११७७

२०

लातूर

८५७७१

७७२०४

१५२४

७०३९

२१

परभणी

४७३८६

४२०८८

८१२

११

४४७५

२२

हिंगोली

१६६५९

१४३६९

२७३

२०१७

२३

नांदेड

८८२५५

८२८५३

२०५४

३३४०

२४

उस्मानाबाद

५१०००

४३६५९

११७७

५२

६११२

२५

अमरावती

८०१५४

६९१११

१२२५

९८१६

२६

अकोला

५०५८१

४४०८९

७८५

५७०३

२७

वाशिम

३५९८८

३१४४९

४६०

४०७६

२८

बुलढाणा

६९९८०

६४५६२

४४२

४९७१

२९

यवतमाळ

६६६६१

६०९०२

१२२२

४५३३

३०

नागपूर

४८०८४२

४४७७८९

६२१२

४७

२६७९४

३१

वर्धा

५४४९७

४८२९१

७३७

८३

५३८६

३२

भंडारा

५७७८६

५४६७०

६४३

२४६४

३३

गोंदिया

३८९९९

३४०२५

४२६

४५४२

३४

चंद्रपूर

८१९६६

७०३७१

१२६४

१०३२९

३५

गडचिरोली

२६५०४

२४०७५

२७४

२१४६

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५४३३५०६

४९२७४८०

८३७७७

२५२२

४१९७२७

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -