घरलाईफस्टाईलझटपट उपवासासाठी रुचकर रेसिपी

झटपट उपवासासाठी रुचकर रेसिपी

Subscribe

पावसाळ्याचे दिवस आले की कधी श्रावण महिना सुरू हे कळतं देखील नाही. तसेच आता आषाढी एकादशी देखील जवळ आली आहे. मग आता श्रावणातला श्रावण सोमवार आणि आषाढी एकादशीला लोक उपवास करतात. म्हणून सतत उपवासाला शाबुदाणा खाऊन कंटाळेल्या लोकांसाठी खास रिसेपी येतो. या उपवासाच्या रिसेपी तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता.

खजूर मिल्क शेक

- Advertisement -

साहित्य

३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची, १२ खजूर, २ कप दूध आणि जर तुम्हाला थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे घ्या.

कृती

- Advertisement -
  • सर्वप्रथम खजूर चांगले स्वच्छ करून घ्या. मग खजूरचे बारीक तुकडे करा.
  • त्यानंतर हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या. तसेच काजूचे देखील बारीक तुकडे करा.
  • खजुराचे बारीक तुकडे आणि थोडे दूध मिक्सर घालून चांगले फिरवून घ्या. पुन्हा त्यामध्ये वेलची पावडर आणि दूध घालून मिक्सरमध्ये फिरवा.
  • झालेल्या मिश्रणात बर्फ घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवा.
  • खजूराचे मिल्कशेक तयार झाल्यानंतर ते एका ग्लासमध्ये ओतून त्यावर काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

फोडणीचे भगर

साहित्य

एक वाटी वरीचे तांदूळ, जिरे, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, शेंगदाण्याचा कुट, साखर आणि पाणी

कृती

  • पहिल्यांदा वरीचे तांदुळ धुवून परतून घ्यावेत.
  • मग नंतर एका पातेल्यात तूप गरम करत ठेवावे. त्यात जिरे आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर वरीचे तांदुळ घालून पुन्हा परतवून घ्यावे आणि नंतर साधारण दुप्पट उकळते पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्यावे.
  • फोडणीचे भगर शिजून झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कुट घालावा. भात मोकळा होण्यासाठी तूप सोडावे. हे झाले फोडणीचे भगर.

रताळ्याची कचोरी

साहित्य

१ वाटी खवलेले खोबरं, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ५० ग्रॅम शेंगदाणे, १ मूठ चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, २५० ग्रॅम रताळी, १ मोठा बटाटा

कृती

  • सर्वात पहिल्यांदा रताळे आणि बटाटे उकडून घ्यावे. त्यानंतर उकडलेल्या रताळे आणि बटाट्यांची सालं काढून ते
  • हाताने कुस्करून बारीक करावे. त्यामध्ये थोडे मीठ घालावे.
  • १ ते २ चमचा तुपवार मिरच्यांचे तुकडे परवून घ्यावेत. त्यानंतर गॅसवरून खाली उतरवून त्यामध्ये इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.
  • रतळ्यांची पारी करून त्यात थोडे सारण घालून कचोऱ्या कराव्यात. नंतर तांदळाच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात.
    तयार झाली ही रताळ्याची कचोरी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -