घरलाईफस्टाईलमुलांचा आवडता 'फ्रुट जॅम', खरंच हेल्दी आहे का?

मुलांचा आवडता ‘फ्रुट जॅम’, खरंच हेल्दी आहे का?

Subscribe

बाहेरील जंक फूड असो, किंवा फ्रुटजॅम आवडीने खातात. हा फ्रुटजॅम आरोग्यासाठी फायदेशीर असतो का ? या विषयी थोडे...

लहान मुलांना सांभाळताना पालकांची चांगलीच दमछाक होते. मुलांचे हट्ट पुरवताना, लाड करताना आणि त्यांच्या आवडी-निवडी जपताना त्यांच्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे? याचाही पालकांना विचार करावा लागतो.
मुलांच्या बाबतीत आरोग्याचा विचार करतांना त्यांना पौष्टिक काय द्यावं? याचा विचार केला तर मुलं ते खातील का? असे प्रश्न पालकांना पडतात. अनेकदा पालेभाज्या खाताना लहान मुलं तोंड वाकडं करतात. घरात केलेले पदार्थ खाताना कंटाळा करतात. मात्र, बाहेरील जंक फूड असो किंवा फ्रुटजॅम आवडीने खातात. हा फ्रुटजॅम आरोग्यासाठी फायदेशीर असतो का? या विषयी जाणून घेऊया…

जॅम आरोग्यासाठी हेल्दी आहे का ?

असं म्हटले जातं की, जॅममध्ये फ्रूट्स आणि न्यूट्रिएंट्स प्रमाण अधिक असतं. एवढचं नाही तर जॅम मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हेल्दी असतो. परंतु खरचं असं असतं का? जाहिरातींद्वारे ते रंजक पद्धतीने दाखवलं जातं आणि त्यामुळे मुलं आकर्षित होऊन फ्रुट जॅम खाण्याचा हट्ट करतात. जॅम तयार करण्यासाठी वेगवेगळी फळं उकळून त्यामध्ये साखर एकत्र करण्यात येते. फळं उकळल्यानंतर त्यांच्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि फळांमध्ये असलेली पोषक तत्वही नष्ट होतात. काही फळांमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असेल तर जॅम तयार करताना हे पूर्णपणे नष्ट होऊन जातं. फ्रुटजॅम हा नैसर्गिकरित्या तयार केला जातो असं नाही. कँमिकलचा देखील त्यात वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यासाठी हाच फ्रुट जॅम हानिकारक ठरू शकतो.

- Advertisement -

फ्रुटजॅम मधील कॅलरी अधिक असल्याने धोका

लहान मुलांनी जास्त प्रमाणात या फ्रुट जॅमचे सेवन केल्यास लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. तसेच हृदयाचे विविध आजार होण्याचा धोका वाढतो. हा धोका फ्रुटजॅम मधील कॅलरीचे प्रमाण अधिक असल्याने संभवतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -