घरभक्तीVastu Tips : घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला असणं शुभ की अशुभ; जाणून...

Vastu Tips : घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला असणं शुभ की अशुभ; जाणून घ्या त्याचे परिणाम

Subscribe

वास्तू शास्त्रानुसार, दक्षिण दिशेला यमराजाची दिशा मानली जाते. या दिशेचा स्वामी स्वतः यमराज आहेत. या दिशाकडे अनेकदा अशुभ दिशा म्हणून पाहिलं जातं. शास्त्रात या दिशेकडे तोंड करुन कोणतेही शुभ कार्य करण्यास नकार दिला जातो. त्याचप्रमाणे या दिशेकडे जर एखाद्या घराचे मुख्य द्वार असल्यास वास्तूदोष निर्माण होतो. मात्र, अनेकदा दक्षिणमुखी दरवाजा बदलणं शक्य नसतं. अशावेळी काही उपाय करुन त्याचे अशुभ दोष तुम्ही दूर करु शकता.

दक्षिणाभिमुख घर असल्यास काय होईल?

Main Door Vastu Shastra: Tips for Placing the Home Entrance

- Advertisement -

 

वास्तू शास्त्रात दक्षिण दिशेचा दरवाजा शुभ मानला जात नाही. त्याला संकटाचे द्वार असेही म्हणतात. जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असल्यास घरातील व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. भावंडासोबत कटुता निर्माण होते, राग आणि अपघात वाढतात. रक्तदाब, रक्ताचे विकार, कुष्ठरोग अशा अनेक आजार होण्याची शक्यता असते. या दिशेला राहिल्याने अपघाती मृत्यूचीही शक्यता निर्माण होते.

- Advertisement -

दक्षिण दरवाजाचे अशुभ परिणाम कसे कमी कराल?

Vastu for main door entrance-importance of front door

  • घराचे मुख्य द्वार दक्षिणेला असल्यास दारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो.
  • दक्षिणाभिमुख घरामध्ये जर मुख्य दरवाजा आग्नेय कोनात केला असेल तर दरवाजाचा रंग लाल, मरुन असावा. यामुळे सकारात्मक परिणाम होतो.
  • दक्षिणाभिमुख दरवाजा असल्यास श्री गणेशांचे दोन फोटो आणा. त्यातील एक घराबाहेर दरवाजावर लावा आणि दुसरा फोटो बाहेरील फोटोच्या मागे आतल्या बाजूने लावा. जेणेकरुन गणपतीची पाठ घराकडे होणार नाही. यामुळे देखील अशुभ परिणाम कमी होतो.
  • जर तुमचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या दारासमोर लाईफ साइज आरसा लावा जेव्हा एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा त्याचे पूर्ण प्रतिबिंब आरशात दिसेल. असे मानले जाते की, घरामध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीसह घरात प्रवेश करणरी नकारात्मक ऊर्जा परत जाते.
  • दरवाजावर नेहमी कुंकवाने स्वास्तिक चिन्ह काढा.

हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये मनी प्लांट लावण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -