घरलाईफस्टाईलपपई खाण्याचे बहुगुणी फायदे

पपई खाण्याचे बहुगुणी फायदे

Subscribe

पोटाची भूक भागवण्यासाठी आणि पोटाची काळजी घेण्यासाठी पपई ठरते बहुगुणी.

सध्या थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. त्यामुळे या दिवसात अधिक भूक लागते आणि आपण बाहेरील विविध अन्नपदार्थावर ताव मारत असतो. यामुळे आपले पोट बिघडते. अशावेशी पोटाची भूक भागवण्यासाठी आणि पोटाची काळजी घेण्यासाठी पपई ही बहुगुणी ठरते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

पपईमध्ये ‘व्हिटमिन ए’ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व्हिटामिन ‘ए’ अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पपईचा आहारात समावेश करावा.

- Advertisement -

मधुमेह असणाऱ्यांन करता हितकारक

पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ ८.३ ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी पपई खाणे हितकारक आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सध्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्यामुळे शरीरातील ‘व्हिटामिन सी’च्या गरजेपेक्षा २०० टक्के अधिक व्हिटामिन ‘सी’ केवळ पपईमधून मिळू शकते.

- Advertisement -

थकवा कमी होतो

थकवा जाणवल्यास पपई एक चांगला आणि रामबाण उपाय आहे. पपई खाल्ल्यास थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच व्हिटामिन सी शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राहते.

रक्त शुद्ध होते

पपईच्या पानांचा रस घेतल्याने रक्त शुद्ध होऊन शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे पपई ही अतिरक्तदाब, हृदयविकार यामध्ये उपयुक्त ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -