Receipe : अगदी सोप्या पद्धतीने बनवा नारळी बर्फी

बाहेरच्या मिठाईपेक्षा तुम्ही घरच्या घरी तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने नारळी बर्फी बनवू शकता.

आपण अनेकदा सणांमध्ये घरातील देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी बाजारातून मिठाई आणतो. मात्र बाहेरच्या मिठाईपेक्षा तुम्ही घरच्या घरी तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने नारळी बर्फी बनवू शकता.

साहित्य :

 • २०० ग्रॅम मावा
 • २०० ग्रॅम साखर
 • २०० ग्रॅम खिसलेला नारळ
 • साजूक तूप गरजेनुसार
 • ट्रायफ्रुट्स

कृती :

 • सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा पाणी आणि साखर टाकून दोनतारी पाक बनवा.
 • आता त्यामध्ये मावा घालून तो चांगला मिक्स करून घ्या.
 • या तयार मिश्रणात खिसलेले खोबरे टाका.
 • आता एका प्लेटमध्ये थोडं तूप घालून त्यावर हे सर्व मिश्रण पसरवून घ्या.
 • आता त्याचे वडीप्रमाणे बारीक काप करा.
 • तयार नारळ बर्फींला तुमच्या आवडीप्रमाणे ट्रायफ्रुट्स घालून सजवा.

हेही वाचा :Receipe : उपवासासाठी बनवा टेस्टी साबुदाणा पुरी