घरलाईफस्टाईलमेंदूला होणार्‍या रक्तप्रवाहावर मिठाचा विपरीत परिणाम, रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड

मेंदूला होणार्‍या रक्तप्रवाहावर मिठाचा विपरीत परिणाम, रिसर्चमधून धक्कादायक माहिती उघड

Subscribe

कोणत्याही चविष्ठ झणझणीत पदार्थाची चव मिठाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र मीठाचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अशातच मिठाच्या वापरामुळे आपल्या मेंदूतील रक्त प्रवाहावर विपरीत परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती एका रिसर्चमधून उघड झाली आहे. जॉर्जियातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून याबाबतचा रिसर्च केला आहे. मेंदूतील रक्त प्रवाह आणि मिठाच्या वापरावर जगात पहिल्यांदाच हे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून मेंदूतील न्यूरॉन अॅक्टिव्हिटी तसेच रक्त प्रवाह यांच्यावर मिठाच्या सेवनामुळे काय परिणाम होतो यासंदर्भात आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. न्यूरोसायन्सचे प्राध्यापक डॉ. जेवियर स्टर्न यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन झाले.

मज्जातंतू जेव्हा कार्यरत होतात तेव्हा काही भागांमध्ये रक्त प्रवाह अधिक वेगवान करतात. याचा संबंध मज्जासंस्था जोडणे किंवा फंक्शनल हायपरिमिया म्हणून ओळखला जातोय. मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे हे कार्य घडत असते. याला धमनी असे म्हटले जाते. दरम्यान जॉर्जियान अभ्यासकांनी मेंदूच्या विकारांचे निदान करण्यासाठी कमकुवर रक्तप्रवाहाचे भाग निवडले. यापूर्वीचे न्यूरोव्हस्कुलर कपलिंगचा अभ्यास मेंदुच्या वरच्या भागांवर झाला आहे. यात संशोधकांनी पर्यावरणीय बदलांमुळे रक्त प्रवाह कसा बदलतो याचे परीक्षण केले होते.

- Advertisement -

यानंतर संशोधकांनी मेंदूच्या रक्तप्रवाहाबाबत अधिक सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी हायपोथालमसवर म्हणजे मेंदूमधील वरच्या भागावर लक्ष केंद्रित केले. ज्यामध्ये खाणे, पिणे, शरीरातील तापमानाची पातळी आणि पुनरुत्पादन यासह शरीराच्या महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये सहभाग असतो. हे संशोधन सेल रिपोर्टसमध्ये प्रकाशित झाले आहे. यात मिठाच्या सेवानामुळे मेंदूच्या रक्तप्रवाहात कसा बदल होतो. याचे परीक्षण करण्यात आले. तर या बदलांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यात मुख्यत्वे: पर्यावरणातून येणार्‍या संवेदी उत्तेजनांनामध्ये (जसे की दृश्य किंवा श्रवणविषयक उत्तेजना) रक्त प्रवाह कसा बदलतो याबाबतचे संशोधन करण्यात आले.

शरीराला सोडियमचे प्रमाण अतिशय अचूकपणे नियंत्रित करणे आवश्यक असल्यामुळे आम्ही मिठाची निवड केली, आमच्या विशिष्ठ पेशीही आहेत ज्या तुमच्या रक्तात किती मीठ आहे याचा शोध घेतात. जेव्हा तुम्ही खारद अन्न खात तेव्हा मेंदू ते जाणवते. यावेळी मीठाची पातळी समान ठेवण्यासाठी शरीरातील यंत्रणा अधिक सक्रिय होतात. असे संशोधक डॉ. जेवियर स्टर्न यांनी सांगितले.

- Advertisement -

या अभ्यासातील निष्कर्षांनी सर्वांना आश्चर्यचकित केले, यावेळी रक्तवाहिन्यांचे निरीक्षण केले जे संवेदी उत्तेजित होणाऱ्या प्रतिसादात कॉर्टेक्समध्ये वर्णन केलेल्या बऱ्याच गोष्टींवर विपरीत करणारे होते. दरम्यान अल्झायमर, स्ट्रोक, इस्केमिया सारख्या रोगांच्या बाबतीत कॉर्टेक्समध्ये रक्त प्रवाह सामान्यतः कमी होतो, असे डॉ. जेवियर स्टर्न यांनी सांगितले. तसेच जेव्हा अतिप्रमाणात मीठ खातो तेव्हा सोडियमची पातळी अधिक कालावधीपर्यंत वाढते. हायपोक्सिया ही एक अशी यंत्रणा आहे जी सतत मीठ उत्तेजित होण्यास प्रतिसाद देण्याची न्यूरॉन्सची क्षमता मजबूत करते. ज्यामुळे त्यांना दीर्घ कालावधीसाठी सक्रिय राहण्याची परवानगी मिळते, असं आम्हाला वाटतेय. असेही जेवियर स्टर्न यांनी सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -