चटपटीत टोमॅटो पकोडे

snacks try the delicious spicy tomato dumplings know recipe
चटपटीत टोमॅटो पकोडे

सध्या अनेक जण घरी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करत आहे. त्यामुळे आज आपण चटपटीत टोमॅटो पकोडे कसे करायचे हे पाहणार आहोत. हे पकोडे तुम्ही सॉस किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या चटणीसोबत खाऊ शकता.

साहित्य

कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मीठ, काळे मीठ, जिरे, चाट मसाला, तीन टोमॅटो, बेसन, तांदळाच पीठ, तूप, बेकिंग सोडा आणि तेल

कृती

सर्वप्रथम एक कप कोथिंबीर, चार ते पाच हिरव्या मिरच्या, तीने ते चार आल्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, थोडसे काळे मीठ, जिरे, चाट मसाला हे सर्व मिक्सरला बारीक करू घ्यायचे. पाणी न घातला हे मिश्रण बारीक करून घ्यायचे. यानंतर या मिश्रणात बारीत शेव घालून त्यात लिंबूचा रस घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यानंतर तीन टोमॅटो गोळ कापायचे. जास्त पातळ कापायचे नाहीत. मग हिरवी चटणी टोमॅटोच्या प्रत्येक कापावर एकाबाजूला लावायची. हे झाल्यानंतर एका भांड्यात एक वाटी बेस घ्यायचे. त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, तूप घालायचे. त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून मिश्रण मिक्स करायचे. जास्त पातळ करू नये. मग या मिश्रणात थोडासा बेकिंग सोडा घालून मिक्स करायचे. त्यानंतर गॅसवर मंद आचेवर कडई ठेवून तेल गरम करायचे. मग टोमॅटोचे काप बेसनच्या मिश्रणात घालून ते तळायचे. अशाप्रकारे तुम्ही चटपटीत टोमॅटो पकोडे तयार करा आणि सॉस सोबत खा.