घरलाईफस्टाईलअशी घ्या साड्यांची काळजी

अशी घ्या साड्यांची काळजी

Subscribe

भारतीय स्रियांसाठी साडी म्हणजे जीव की प्राण! साड्या नेसणे सोप्पे आहे; पण त्या वर्षानुवर्षे नीट जपून ठेवणे कठीण असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रसंगानुरुप, सणासुदीला विविध प्रकारच्या व रंगांचा मेळ साधणार्‍या घेतलेल्या भारी साड्यांची देखरेखही तितकीच काळजीपूर्वक करण्याकडे महिलांचा कल असतो. कितीही नव्या फॅशनच्या साड्या बाजारात आल्या तरी परंपरेचा बाज सांभळणारी साडी अप्रतिमच असते.

या तुमच्या प्राण प्रिय साड्यांची काळजी कशी घ्यावी याकरिता काही खास टिप्स पुढीलप्रमाणे.

*नक्षीकाम केलेल्या साड्यांना विशेष जपावे लागते. अशा साड्या धुताना जास्त पिळून घेऊ नयेत. अशाने त्यावरील जरीचे काम, मणी टिकल्यांचे कोंदण निघू शकते.

- Advertisement -

*अशा साड्या वॉशिंग मशिनमध्ये धुतल्यास, ब्रशने घासल्यास लवकर खराब होतात. म्हणून, हलक्या हाताने नीट विसळून घ्याव्यात.

*साधारण दोनदा साडी वापरल्यानंतर ड्रायक्लीनला द्यावी.

- Advertisement -

*साड्या सावलीत सुकवाव्यात, यामुळे साडीची चमक टिकून रहाते.

*बॅगमध्ये साड्या ठेवण्याआधी प्रत्येक साडी तपकिरी रंगाच्या कागदात गुंडाळावी. यामुळे, हवेतील दमटपणा कागद शोशून घेतो व साडी सुरक्षित रहाते.

*जरीच्या साड्या मलमलच्या किंवा कॉटनच्या कपड्यात गुंडाळून ठेवल्या तर त्यावरील जरीचे काम छान टिकते.

*सिल्कच्या साडीवर थेट डिओचा वापर करु नये. कारण, साडीवर डिओचे डाग पडण्याची शक्यता असते.

* वरचेवर न वापरल्या जाणार्‍या साड्या, वॉर्डरॉब स्वच्छ करताना किमान त्या कोरड्या हवेत उघडून ठेवाव्यात.

*बरेचदा साडी घडी झालेल्या रेषेवर फाटते, यासाठी काही महिन्यांच्या अंतरांनी साड्यांची घडी बदलावी.

*सिल्कच्या साड्यांची घडी घालताना टिश्यू पेपरचा वापर करायचा. त्यामुळे त्या कपड्यांत ओलसरपणा रहात नाही. टिश्यू पेपरऐवजी बटर पेपरवर साडी रोल करून ठेवली तरी चालेल.

*जरी काळी पडली तर पॉलिश करायची. पण सारखी पॉलिश नाही करायची. या जरीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची. कारण पाण्यामुळेच सर्वात जास्त जर काळी पडते.

*कपाटात कडुलिंबाची पाने ठेवावीत, ज्यामुळे कपाटातील कुबटपणा दूर होऊन, कपड्याला बुरशी येऊन कपडा खराब होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -