सौंदर्य खुलवण्यासाठी खास ‘घरगुती फेसपॅक’

Face Pack

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाहीलाही आणि उन्हामुळे काळवंडणारा चेहरा. या सगळ्यामुळे खासकरून तरुणी प्रचंड हैराण झाल्या आहेत. या उन्हात देखील सुंदर दिसावं याकरता आजकालच्या तरुणी पार्लरमध्ये जाऊन असंख्य पैसे खर्च करतात. तसेच अनेक वेगवेगळ्या केमिकलच्या वापरामुळे चेहर्‍याचे नुकसान देखील होते. परंतु घरगुती फेसपॅकमधून उपाय केल्याने चेहरा खुलण्यास मदत होते आणि चेहर्‍याला नॅचरल ग्लो देखील येतो.

कॉफी – मध फेसपॅक
चेहरा फ्रेश वाटावा यासाठी कॉफी आणि मध यांचे मिश्रण केलेला लेप लावावा. यासाठी २ चमचे कॉफीमध्ये १ चमचा मध टाकून त्याचा लेप करावा. हा लेप तुम्ही दिवसातून एकदा वापरावा. यामुळे चेहरा फ्रेश होण्यास मदत होते.

दूध – टॉमेटो फेसपॅक
चेहरा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी २ चमचे दुधामध्ये १ चमचा टोमॅटो ज्यूस मिक्स करावा. हे मिश्रण रात्रभर चेहर्‍याला लावून ठेवावं. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन काळे डाग दूर होण्यास मदत होते.

कोरफड – हळद फेसपॅक
कोरफडीच्या गरामध्ये एक चमचा हळद मिक्स करावी. हा लेप दिवसातून एकदा लावल्याने तेलकट चेहरा दूर होण्यास मदत होते.

खोबरेल तेल – हळद फेसपॅक
निरोगी त्वचेसाठी १ चमचा खोबरेल तेलात २ चमचे हळद टाकावी. यामुळे तुमचा चेहरा उठावदार दिसेल.

लिंबू – दही फेसपॅक
चेहरा उजळण्यासाठी २ चमचे लिंबाच्या रसात २ चमचे दही टाकावे. हा लेप चेहर्‍याला लावल्याने चेहरा उठावदार दिसेल.

केशर – साय फेसपॅक
१ चमचा साय घेऊन त्यात थोडेसे केशर मिक्स करून हा फेसपॅक चेहर्‍याला लावल्यामुळे कोरडेपणा कमी होतो.

मुलतानी माती – गुलाब पाणी
मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करून हा फेसपॅक चेहर्‍याला लावल्यामुळे चेहर्‍याचा काळपटपणा दूर होतो.