घरलाईफस्टाईलMenopause Diet: रजोनिवृत्तीची समस्या टोमॅटो खाल्याने होते कमी; जाणून घ्या कसा असावा...

Menopause Diet: रजोनिवृत्तीची समस्या टोमॅटो खाल्याने होते कमी; जाणून घ्या कसा असावा आहार

Subscribe

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. रजोनिवृत्तीची अनेक लक्षणे आहेत जसे की मासिक पाळीच्या चक्रात बदल होणे, पाळी महिन्याच्या महिन्याला येते. मात्र रक्तस्त्राव कमी होतो किंवा खूप रक्तस्त्राव होत राहणे, झोपेची समस्या, मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग, वजन वाढणे आणि कमी चयापचय, नैराश्य, केस, त्वचा आणि इतर बदल.

रजोनिवृत्तीचा स्त्रियांवर खूप परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, टोमॅटोच्या वापरामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. संशोधनानुसार, 200 मिलीलीटर टोमॅटोचा रस 8 आठवडे दिवसातून दोनदा पिल्याने रजोनिवृत्तीची समस्या कमी होऊ शकते. टोमॅटो नैराश्यावर उपचार करण्यासाठी देखील खूप प्रभावी असल्याचेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोमुळे स्तनाचा कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. एवढेच नव्हे तर टोमॅटोमुळे हाडांचे आरोग्यही सुधारते.

- Advertisement -

रजोनिवृत्ती दरम्यान घ्या अशी काळजी

  • रजोनिवृत्ती दरम्यान संतुलित आहार घ्या. आहारात शाकाहारी आणि फायबर समृद्ध गोष्टी समाविष्ट करा.
  • आहारातील चरबी, तेल आणि साखर कमी करण्यासह विविध प्रकारची फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा.
  • दूध, दही आणि चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये पुरेसे प्रमाण घेतले पाहिजे जेणेकरून शरीराला कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन के मिळू शकेल.
  • रजोनिवृत्तीनंतर अचानक वजन वाढू शकते, म्हणून दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करा.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -