घरलाईफस्टाईलतूरडाळीची कुरकुरीत भजी

तूरडाळीची कुरकुरीत भजी

Subscribe

तूरडाळीची चमचमीत भजी कशी कराल?

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे आपल्याला गरमागरम पदार्थ आणि चटपटीत पदार्थ खावेस वाटतात. त्यामुळे आपण भजी खायला अधिक पसंती देतो. त्यामुळे आज आपण तूरडाळीची कुरकुरीत आणि खमंग भजी कशी बनवतात हे पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

तूरडाळ २ वाट्या
कांदे – २ ते ३ (बारीक चिरून)
आले – दीड इंच
ओल्या मिरच्या – २ ते ३
उकडलेला १ बटाटा
लसूण – ७ ते ८ पाकळ्या
बारीक चिरलेली कोथींबीर
मीठ – चवीनुसार
तळण्यासाठी तेल

कृती

- Advertisement -

तूरडाळ ४ ते ५ तास भिजत ठेवून नंतर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आले, लसूण, मिरची यांची पेस्ट तसेच उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करावे. तेल गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे त्यात सोडून मध्यम आचेवर खरपूस तळून घ्यावेत. अशी गरमागरम भजी नुसती सुद्धा खायला चांगली लागतात. पण कोणाला हवे असेल तर सोबत चटणी द्यायलाही हरकत नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -