घरलाईफस्टाईलफॅशनेबल स्वेटर वापरा,थंडीतही हटके लूक ठेवा

फॅशनेबल स्वेटर वापरा,थंडीतही हटके लूक ठेवा

Subscribe

अश्विन महिना सरला की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. या महिन्यात वातावरणात गारवा जाणवू लागतो. या आल्हाददायक वातावरणात मोह होतो तो पिकनिकला जाण्याचा. मात्र, पिकनिकला जाताना जरा हटके आणि फॅशनेबल असा लूक देखील हवा असतो. परंतु, एकीकडे थंडी आणि त्यात फॅशनेबल लूक यांची सांगड घालणे कठीणच. पण तुम्ही थंडीत देखील स्वतः चा असा हटके लूक ठेवू शकता. चला तर जाणून घेऊया असेच काही स्वेटरचे हटके प्रकार जे तुम्हाला थंडीत देखील फॅशनेबल लूक देतील.

थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्रास वापरले जाणारे म्हणजे स्वेटर. लहान बाळांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण स्वेटरचा वापर करतात. या स्वेटरमध्ये अनेक व्हरायटी असतात. सामान्यतः यापूर्वी लोकरीपासूनच स्वेटर बनवले जायचे. या स्वेटरची ऊब काही औरच असायची. मात्र आता यात कालानुरूप बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे स्वेटर पाहायला मिळतात. या स्वेटरमध्ये विविधता येऊ लागली आहे. सध्या बाजारात उलनचे स्वेटर, वेलवेट स्वेटर आणि हुडी असे अनेक प्रकार आहेत.

उलनचे स्वेटर

- Advertisement -

उलनचे स्वेटर म्हटलं का आठवण येते ती आजीने बनवलेल्या स्वेटरची. उलनच्या स्वेटरमध्ये आजीच्या प्रेमाची ऊब भासते. सध्या या स्वेटरमध्ये रंगाची विविधता आढळून येत आहे. यामध्ये फुल हँड, सिव्हलेस आणि टीशर्टसारखे स्वेटर आढळून येतात.

फुल हँड लोकरीचे स्वेटर सर्व प्रकारच्या कपड्यांवर शोभून दिसतात. हे स्वेटर ड्रेस, कुर्ती यावर अधिक आकर्षित दिसतात. तसेच बटन नसलेली टीशर्ट सारखी स्वेटर तरुणांना अधिक शोभून दिसतात. जीन्स घातल्यास त्यावर डायरेक्ट घालण्यात येणारे स्वेटर छान आणि उठून दिसते. तर सिव्हलेस टीशर्ट मुलांना उठून दिसतात. तसेच यामध्ये ग्रे, पांढरा, ब्राऊन आणि लाल या रंगाचे स्वेटर उठून दिसण्यास मदत होते.

- Advertisement -

वेलवेट स्वेटर

वेलवेट स्वेटरची सध्या बाजारात चलती आहे. बर्‍याच व्यक्ती वेलवेटची स्वेटर खरेदी करतात. अगदी लहान बाळांपासून ते तरुणाईपर्यंत सर्वजण वेलवेट स्वेटरचा वापर करू शकतात. मात्र, वेलवेट स्वेटर हे लहान मुलांना अधिक आकर्षित दिसतात. या स्वेटरचा संपूर्ण सेट असतो. यामध्ये जॅकेट, टोपी आणि पँट एकाच रंगाचे असतात. या स्वेटरची टोपी स्वेटरलाच जोडलेली असते. त्यामुळे या स्वेटरवर वेगळी कानटोपी घालण्याची गरज नसते. यावर एक वेगळाच लूक दिसतो. ही स्वेटर सर्वात जास्त लहान मुलांना उठून दिसणारी असतात. त्याचबरोबर संपूर्ण अंग या स्वेटरने झाकले जाते.

हुडी

सध्या हुडीच्या फॅशनची चलती आहे. बरेच तरुण – तरुणी थंडीत हुडीचा वापर करतात. हुडीमध्ये विविधता असून ही हुडीमध्ये एक वेगळाच लूक दिसतो. हुडी जीन्स आणि टीशर्टवर अधिकच आकर्षित दिसते. थंडीत गारव्यापासून संरक्षण देखील होते आणि फॅशन देखील होते. सध्या हुडीला विशेष मागणी आहे. तरुण – तरुणी मोठ्या संख्येने हुडीचा अधिक वापर करतात. त्यामुळे थंडीतही लूक हटके दिसतो.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -