घरलाईफस्टाईलऑफिसला जाताना दैनंदिन वापरातील कपड्यांचा करा असा वापर

ऑफिसला जाताना दैनंदिन वापरातील कपड्यांचा करा असा वापर

Subscribe

ऑफिसला जाण्याची तयारी करत असताना तुम्हालाही आज कोणता ड्रेस घालावा, हा प्रश्न पडतो का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल तर तुमच्या कपाटात काही गोष्टी नव्याने अ‍ॅड करण्याची गरज आहे, हे लक्षात घ्या.

कपाटात गोष्टी व्यवस्थित ठेवा 

अनेकदा अनेक गोष्टी म्हणजे बेल्ट, स्टोल, बॅग किंवा काही ड्रेस आपल्या कपाटाच्या एखाद्या कोपर्‍यात पडलेले असतात. ज्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. अशावेळेस ऑफिसला जाण्याच्या घाईत आपण तेच कपडे घालतो, जे कपाट उघडल्यानंतर आपल्याला लगेच दिसतात.तुमच्या बाबतीत असे घडू नये यासाठी कपाटात सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवा. म्हणजे आपल्याला एखादा ड्रेस किंवा इतर गोष्टी निवडायच्या असतील तेव्हा आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील.
काळा, पांढरा, ग्रे, ब्राऊन रंगाची लेगीन किंवा ट्राऊझर तुमच्या कपाटात अवश्य असायला हवी.

जुन्या कपड्यांना द्या नवा लूक

स्वत:ला वेगळा लूक देण्याची इच्छा असेल तर ही इच्छा तुम्ही केवळ नविनच नाही तर जुन्या कपड्यांच्या माध्यमातूनही पूर्ण करु शकता. म्हणजे जर तुम्ही एखादी पांढर्‍या रंगाची कुर्ती घालत असाल तर त्यावर एखाद रंगीबेरंगी नेकलेस घाला. किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस घालत असाल तर त्यावर पांढर्‍या मोत्यांचा सेट घाला. अशा प्रकारचे मिस मॅच कॉम्बिनेशन करुन तुम्ही तुमच्या जुन्या कपड्यांना नवा लूक देऊ शकता. वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची अ‍ॅक्सेसरीज मॅच करुन घातली तर तुम्ही तुमची स्टाईल निर्माण करु शकाल आणि बघणार्‍यांना वाटेल की तुम्ही एखादा नवीन ड्रेस घातला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -