घरभक्तीVastu Tips : स्वयंपाकघरासंबंधित 'हे' नियम पाळल्याने देवी अन्नपूर्णा होते प्रसन्न

Vastu Tips : स्वयंपाकघरासंबंधित ‘हे’ नियम पाळल्याने देवी अन्नपूर्णा होते प्रसन्न

Subscribe

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरासाठी अनेक वास्तु टिप्स देण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्राच्या मते, स्वयंपाकघराशी संबंधित वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे देवी लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते. त्यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होते.

वास्तु शास्त्रामध्ये घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार स्वयंपाकघरात साक्षात देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णेचा निवास असतो. देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांच्या आशीर्वादामुळे जीवनात धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही असे म्हणतात. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरासाठी अनेक वास्तु टिप्स देण्यात आल्या आहेत. वास्तुशास्त्राच्या मते, स्वयंपाकघराशी संबंधित वास्तूच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे देवी लक्ष्मी रागावते आणि घरातून निघून जाते. त्यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होते.

स्वयंपाकघरामध्ये कधीही अन्न खाऊ नका

- Advertisement -

How To Trick Your Family Into Eating More Veggiesवास्तु शास्त्रानुसार स्वयंपाकघरात चुकूनही अन्न खाऊ नये. असे मानले जाते की स्वयंपाकघरातील अन्न खाल्ल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होतात. वास्तुशास्त्रात यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच घरात आर्थिक समस्या निर्माण होते.

स्वयंपाकघरात चप्पल घालू नये

- Advertisement -

The Best Shoes To Wear While Working The Kitchen Kitchn | karl-nied.de
वास्तु शास्त्रानुसार देव घरात आणि स्वयंपाकघर कधीही चप्पल घालू नये. वास्तु शास्त्रामध्ये या ठिकाणांना सर्वात पवित्र स्थान मानले जाते. या ठिकाणी देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.

स्वयंपाकघरात देवघर ठेवू नये

Buy Copper Sheesham & Mdf Wooden Pooja Mandir Without Door Online - Mandirs - Spiritual - Home Decor - Pepperfry Productवास्तु शास्त्राच्या नियमानुसार स्वयंपाकघरात देवघराची स्थापना करू नये. घरातील पूजा-मंदिर बनवण्यासाठी जागा स्वच्छ आणि शांत असावी, जेणेकरून तिथे बसून पूजा करता येईल. खरंतर, जेवणाशी संबंधित वस्तू स्वयंपाकघरात विखुरलेल्या असतात. अशा स्थितीत पूजा मंदिर अपवित्र होऊ शकते. तसेच तेथे नकारात्मकता देखील उत्पन्न होते.

स्वयंपाकघरासमोर स्नानगृह बनवू नका

रात्री आंघोळ करण्याचे 'असे' फायदे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल... - Marathi News | health benefits of bath in night, bathing in night, hot shower in night | Latest health News at Lokmat.com
वास्तु शास्त्राच्या नियमांनुसार घराचे स्वयंपाकघर आणि स्नानगृह कधीही समोरासमोर नसावेत. असे केल्याने घरात आजार पसरू लागतात. त्याचबरोबर मानसिक अस्वस्थताही निर्माण होते.

स्वयंपाकघरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेऊ नये 

Noticeable advantages of Natural Dish-washing liquid - SacredEarth
रात्री जेवण झाल्यानंतर अनेक घरांमध्ये घाण भांडी स्वयंपाकघरात तशीच ठेवली जातात. वास्तुशास्त्रानुसार हे नियमाच्या विरुद्ध आहे. अशा स्थितीत देवी अन्नपूर्णा रागावते आणि घरातून निघून जाते. त्यामुळे विशेषत: रात्री जेवल्यानंतर भांडी आणि स्वयंपाकघर साफ केल्यानंतरच झोपावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.


हेही वाचा :

Vastu Tips : घरामध्ये मोरपंख ठेवल्याने येते सुख-समृद्धी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -