घरभक्तीVastu Tips : योग्य दिशेला लावलेले घड्याळ ; करेल तुमचे आयुष्य सुखकर

Vastu Tips : योग्य दिशेला लावलेले घड्याळ ; करेल तुमचे आयुष्य सुखकर

Subscribe

आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील घड्याळ यांसारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तुचे काही नियम आहेत.

वास्तु शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य दिशा सांगितली आहे. वास्तु शास्त्रानुसार जर आपण प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य दिशेला ठेवली तर, नक्कीच आपल्याला त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. खरंतर आपल्या घरापासून ते व्यापाराच्या ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वास्तुचे मोठं महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे घरातील कपाट, घराचा रंग, पूजा घर, घरातील घड्याळ यांसारख्या प्रत्येक गोष्टीमागे वास्तुचे काही नियम आहेत.

अशीच आपल्या घरातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ, घड्याळाचे आपल्या आयुष्यात तसेच आपल्या वास्तुमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. घड्याळ फक्त आपल्याला वेळंच सांगत नाही तर , ते आपल्या भाग्याशी सुद्धा जोडलेले असते. त्यामुळे जर हे चुकीच्या दिशेला लावले तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागू शकते. यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण होते. परंतु घड्याळ जर योग्य दिशेला लावले असेल तर घरात सुख-शांती टिकून राहते.

- Advertisement -

घड्याळाशी जोडलेले काही नियम

- Advertisement -
  • घड्याळ नेहमी पूर्व , पश्चिम आणि उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही या दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावू शकता.
  • घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये. कारण या दिशेला घड्याळ लावल्याने तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. आणि घरातील प्रमुख सदस्याची प्रकृती सतत खराब होते. शास्त्रात दक्षिण दिशेला यम देवाची दिशा मानली जाते. यम हा मृत्यूचे दैवत आहे. त्यामुळे या दक्षिण दिशेला असलेले घड्याळ तुम्हाला मृत्यू तुल्य कष्ट देऊ शकते.
  • घड्याळ कधीही प्रवेश दारासमोर लावू नका, यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.
  • घरात कधीही खराब घड्याळ लावू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • तसेच घरातील घड्याळ कधीही बंद पडणार नाही याची काळजी घ्या. बंद घड्याळ तुमचे यश थांबवते.
  • घड्याळावर कधीही धूळ बसणार नाही, याची काळजी घ्या.

घरात या प्रकारचे घड्याळा लावा

  • घड्याळ कधीही गोल किंवा अंडाकृती आकाराचे लावावे, चौकोनी आकाराचे घड्याळ वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते.
  • घड्याळ्याचा रंग कधीही हिरवा, काळा किंवा नारंगी असू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  • बेडरूममधील घड्याळ कधीही गोल आकाराचे असावे, यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.
  • तसेच झोपताना घड्याळ कधीही उशी जवळ ठेवू नका, यामुळे तुम्हाला मानसिक तणाव येऊ शकतो.

 

 

 

Vastu Tips : घरात या दिशेला कॅलेंडर लावल्याने; चमकेल तुमचे भाग्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -