घरलाईफस्टाईलमधुमेहींसाठीही फायदेशीर खजूराचे आंबट-गोड लोणचे ; जाणून घ्या कृती

मधुमेहींसाठीही फायदेशीर खजूराचे आंबट-गोड लोणचे ; जाणून घ्या कृती

Subscribe

खजूरमध्ये विटामिन, पोटॉशियम, कॉपर असे अनेक पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी मदत होते. तसेच खजूर खाल्ल्याने ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आतापर्यंत तुम्ही कैरी, लिंबू , मिरची, आवळा यांपासून बनलेले प्रत्येक प्रकारचं लोणचे खाऊन पाहिले असेल. परंतु तुम्ही यावेळी खजूरचे स्पेशल लोणचे नक्की ट्राय करा. खरंतर खजूरमध्ये विटामिन, पोटॉशियम, कॉपर असे अनेक पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यासाठी मदत होते. तसेच खजूर खाल्ल्याने ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- Advertisement -

खजूर लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • ३०० ग्राम खजूर
  • १ चमचा लाल मिरची पाउडर
  • ३ चमचा धने पाउडर
  • ३ चमचा बडीशेप पाउडर
  • ३ चमचा जीरे पाउडर
  • १ कप लिंबाचा रस
  • मीठ चवीप्रमाणे

खजूर लोणचे बनवण्याची कृती

- Advertisement -
  • खजूर लोणचे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मंद आचेवर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाणी गरम होताच यामध्ये खजूर टाकून, ते उकळून घ्या.
  • जेव्हा ते खजूर नरम होतील तेव्हा, त्याच्या बिया काढून टाका.
  • आता एका वाटीत खजूर , लाल मिरची पाउडर , बडीशेप पाउडर, जीरा पाउडर एकत्र करून घ्या आणि एका भरणीमध्ये भरून ठेवा.
  • एका वाटीत लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून ठेवा आणि खजूरच्या मिश्रणावर टाका. मात्र यात खजूर जेवढे भिजेल, तेवढाच लिंबाचा रस घ्या.
  • खजूर लोणचे तयार झाले. लोंच्याच्या भरणीला ७ दिवसापर्यंत थोड-थोड हलवत रहा. ज्यामुळे लोणचे चांगले एकजीव होईल.
  • एका  आठवड्यानंतर खजूर लोणचे खाण्यासाठी तयार होईल.

 

 

उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे ५ आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -